साखरखेर्डा येथे ३२२ जणांना दिली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:36 AM2021-05-07T04:36:53+5:302021-05-07T04:36:53+5:30
साखरखेर्डा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध होत नसल्याने कर्मचारी आणि नागरिक हैराण झाले होते. अखेर ६ मे ...
साखरखेर्डा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध होत नसल्याने कर्मचारी आणि नागरिक हैराण झाले होते. अखेर ६ मे राेजी लस उपलब्ध झाल्याने ३२२ जणांचे लसीकरण करण्यात आले . लसीकरण केंद्रावर ग्रामस्थांनी गाेंधळ केल्याने पाेलिसांना पाचारण करण्यात आले.
साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत अनेक गावे आहेत. साखरखेर्डा गावाची लोकसंख्या पाहता लसीकरणाचा कार्यक्रम हा आठवड्यातून एक किंवा दोन दिवसच होत आहे. दररोज शेकडो युवक आपल्या नावाची नोंद करुन लस मिळावी म्हणून लसीकरण केंद्रावर उपस्थित होतात. लस केव्हा उपलब्ध होईल याचे कोणतेही नियोजन नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गुरुवारी सकाळी लस उपलब्ध झाली असता काही मोजक्याच लाेकांना याची माहिती लसीकरण केंद्रावरुन देण्यात आल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला. तसेच लसीकरण केंद्रावर लस मिळत नसल्याचे पाहून अनेकांनी गाेंधळ सुरू केला हाेता. त्यामुळे, आराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाेलिसांना पाचारण केले. पाेलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढून शांत केले. प्राथमिक आराेग्य केंद्रात माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत असल्याने काेराेना विषयक नियमांचे उल्लंघन झाले.