मासरुळ येथे ३५० जणांना दिली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:26 AM2021-04-29T04:26:40+5:302021-04-29T04:26:40+5:30
लसीकरणाच्या चाैथ्या टप्प्यात ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे़ यापूर्वी पहिला टप्पा १० एप्रिल रोजी ५० जणांना, १५ एप्रिल ...
लसीकरणाच्या चाैथ्या टप्प्यात ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे़ यापूर्वी पहिला टप्पा १० एप्रिल रोजी ५० जणांना, १५ एप्रिल रोजी ७० जणांना, २६ एप्रिल रोजी ८० जणांना आणि २८ एप्रिल रोजी १५० जणांना अशा एकूण ३५० जणांना लस देण्यात आली़ जालिंधर बुधवत यांनी २७ एप्रिल रोजी पाडळी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कोरोनासंदर्भात असलेल्या इतर समस्या व लसीचा तुटवडा याबाबत माहिती घेऊन लगेचच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली़ मासरुळ येथे २८ एप्रिल राेजी १५० लस उपलब्ध झाल्या हाेत्या़ पंचायत समिती सदस्य दिलीप सिनकर व सरपंच शकुंतला महाले, माजी सरपंच शेषराव सावळे, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर देशमुख, किरण उगले, सुभाष पवार, डॉ़ फुसे, संभाजीराव देशमुख, डॉ़ काटोले यांनी घरोघरी जाऊन लस घेण्याबद्दल जागृती केली़ वैद्यकीय अधिकारी डॉ. तुपकर व डॉ. बाहेकर यांच्या मार्गदर्शनात शिबिर पार पडले. यासाठी ग्रामपंचायत प्रशासन तलाठी इतवारे व ग्रामविकास अधिकारी हिवाळे व आशासेविका तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने लसीकरण यशस्वीरीत्या पार पडले़