धामणगाव बढे येथे ३७५ जणांना दिली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:32 AM2021-03-24T04:32:02+5:302021-03-24T04:32:02+5:30
धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रतिबंधक लसीकरण मोहीम ८ मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. ...
धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रतिबंधक लसीकरण मोहीम ८ मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तथा ४५ वर्षांपुढील दुर्धर आजार असलेल्या नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यास प्रारंभ झाला आहे. धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आठवड्यातील तीन दिवस लसीकरण करण्यात येते आतापर्यंत सुमारे ३७५ नागरिकांना यशस्वीरीत्या लसीकरण करण्यात आले आहे .जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश नारखेडे, औषध निर्माता प्रदीप देशमुख तसेच त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत. धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतरही ठिकाणी त्यासाठी चांगली व्यवस्था राबवली जात आहे .मोताळा तालुक्यामध्ये बोराखेडी, पिंपरी गवळी, पिंपळगाव देवी तथा धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती लसीकरण मोहीम राबविली जात आहे .कोरोना हद्दपार करण्यासाठी मोताळा तालुक्यातील नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन मोताळा तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले आहे.