माणसांचे लसीकरण लांबले अन् जनावरांचे लटकले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:36 AM2021-05-18T04:36:00+5:302021-05-18T04:36:00+5:30
काळात साथीचे आजार बळावले आहेत. यामुळे लसीकरण प्रभावित झाले आहे. माणसांच्या लसीकरणासोबतच जनावरांचे लसीकरणही लसींचा पुरवठा कमी असल्याने प्रभावित ...
काळात साथीचे आजार बळावले आहेत. यामुळे लसीकरण प्रभावित झाले आहे. माणसांच्या लसीकरणासोबतच जनावरांचे लसीकरणही लसींचा पुरवठा कमी असल्याने प्रभावित झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामध्ये अनेक पदे रिक्त आहेत. वाढत्या पशुधनाच्या संख्येपुढे निर्मित पदांची
संख्या मोजकीच आहे. यामुळे पशुधन लसीकरण आणि विविध कामे पार पाडताना पशुधन विभागाला विविध अडचणींचा सामना करावा लागतो.
जिल्ह्यातील जनावरांची संख्या
शेळ्या - ३६४६८९
मेंढ्या - १२५२८०
गाय - १९८८९१
म्हैस - १३४१४८
कोणकोणत्या दिल्या जातात लस?
जनावरांना विविध आजारांवर लसीकरण करावे लागते. त्यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासते. प्रामुख्याने घटसर्प, एकटांग्या, तोंडरुरी, पायखुरी आदी लस दिल्या जातात. विविध लसी पावसाळ्यात दिल्या जातात. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.
नोव्हेंबर हुकला, आता काय होणार?
लंपी स्कीन डिसिजमुळे जनावरांचे लसीकरण प्रभवित झाले आहे. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात जनावरांना साथरोगाचा सामना करावा लागला. गावपातळीवर जनावरांच्या या आजाराला नियंत्रित करण्यासाठी प्रारंभी लंपी स्कीन डिसिज रोखण्यासाठी लसीकरण करण्यात आले. संपूर्ण यंत्रणा या कापतात अविरत झटली आहे, यामुळे जनावरे या आजारापासून सुरक्षित राहिली.
यावर्षी वेळेपूर्वीच, होणार लसीकरण
पशुपालक लसीकरणाबाबतीत जागरूक आहेत. लंपी स्कीन डिसिजपासून नागरिकांना लसीचे महत्त्व कळाले आहे. प्रत्येक पशुपालकाने त्यासाठी आवर्जून पुढाकार घेतला. पावसाळ्यात साथरोग टाळण्यासाठी लसीकरणाचे नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.
पशुपालक चिंतेत
आमचे गाव पशुधनावरच मोठे झाले आहे. गावामध्ये मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. लंपी स्कीन डिसिजपासून प्रत्येकजण अधिक अलर्ट झाला आहे. डॉक्टरांना लसीकरणासाठी स्वत:हून बोलवतात.
गणेश देवकर
पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. या पशुधनाला संवर्धन करणे आणि काळजी घेणे यासाठी पूर्वीपेक्षा आता जास्त दक्ष राहावे लागते. वरच्यावर लसीकरण करावे लागत आहे.
रामा जाधव.