२०० डाेस परत गेल्याने लसीकरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:34 AM2021-04-18T04:34:44+5:302021-04-18T04:34:44+5:30

रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १५ दिवसांपूर्वी भडगाव, पिंपळगाव सराई, शिरपूर, नांद्राकोळी, पांगरी ,केसापूर यांच्यासह सात उपकेंद्रांवर कोविंड लसीकरण सुरू ...

Vaccination stopped due to return of 200 days | २०० डाेस परत गेल्याने लसीकरण ठप्प

२०० डाेस परत गेल्याने लसीकरण ठप्प

Next

रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १५ दिवसांपूर्वी भडगाव, पिंपळगाव सराई, शिरपूर, नांद्राकोळी, पांगरी ,केसापूर यांच्यासह सात उपकेंद्रांवर कोविंड लसीकरण सुरू करण्यात आले हाेते़ लसीच्या तुटवड्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून हे सर्व केंद्र बंद होते़ १५ एप्रिल रोजी रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला ३०० कोविड लसी मिळाल्या होत्या़ त्या दिवशी भडगाव, रायपूर, शिरपूर यातील केंद्रावर फक्त १०० नागरिकांना लसीकरण करण्यात आले होते़ लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण न झाल्यामुळे बुलडाणा तहसीलदार यांच्या आदेशाने रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील २०० डाेस या दुसऱ्या केंद्रावर पाठवण्यात आल्या़ रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या एकही लस नसल्यामुळे नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत़ याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

काेट

बुलडाणा तहसीलदार यांच्या आदेशानुसार रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील दाेनशे डाेस परत करण्यात आले आहेत. लस मिळताच सर्वच केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात येणार आहे़

डाॅ़ कविता नागलकर, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, रायपूर

Web Title: Vaccination stopped due to return of 200 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.