अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानावरील नामफलकांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 03:15 PM2019-12-03T15:15:28+5:302019-12-03T15:16:55+5:30
दोन नाम फलकाची अज्ञात व्यक्तीने तोडफोड करून नुकसान केल्याची घटना १ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: येथील अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या निवासस्थानातील प्रवेशद्वार समोरील दोन नाम फलकाची अज्ञात व्यक्तीने तोडफोड करून नुकसान केल्याची घटना १ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी २ डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांना झालेल्या धमकावण्याच्या या प्रयत्नानंतरही अप्पर जिल्हाधिकाºयांनी शासकीय वाहनाने कार्यालयात न जाता थेट सायकलने ते कार्यालयात पोहचले.
बुलडाणा येथे कार्यरत अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे हे बुलडाणा येथे कार्यरत झाल्या पासून त्यांनी वाळू माफिया विरोधात मोठ-मोठे करवाया करुण शासनाला मोठा महसूल मिळवून दिला आहे. रेती व गौणखनिज तस्करांमध्ये त्यांचा दरारा कायम आहे. ते रात्री बे रात्री जिल्ह्यात फिरून विना रॉयल्टीचे वाळू घेऊन जाणारे वाहन पकडत असतात. बुलडाणा येथील सरकारी तलाव रोडवर संत चोखामेळा नावाचे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांचे शासकीय निवासस्थान आहे. या निवास स्थानासमोरील प्रवेशद्वारावर त्यांच्या नावाचा व निवासस्थानाचा फलक होता. दोन दिवसापुर्वीच त्यांनी बुलडाणा तालुक्यातील चांडोळ व बुलडाणा शहर येथे अवैधरित्य साठवणुक केलेल्या रेतीवर कारवाई केली होती. याच कारवाईचा धसका घेत काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील दोन्ही नाम फलकाची तोडफोड केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. विशेष म्हणजे मागील वर्षी २८ डिसेंबर २०१८ रोजी सुध्दा त्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशव्दाराची कडी बाहेरून बंद करण्यात आली होती. दरम्यान, आज अप्पर जिल्हाधिकारी दुबे यांनी शासकिय वाहन न वापरता ते चक्क सायकलने व विना आपले अधिकृत शस्त्राचे जिल्हाधिकारी कार्यालय गेले. (प्रतिनिधी)