विविध मागण्यांसाठी मेहकर उपविभागीय कार्यालयावर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:21 PM2018-02-27T14:21:06+5:302018-02-27T14:21:06+5:30
मेहकर : मेहकर महसूलची इमारत जुन्याच जागेवर बांधावी, गारपीटग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी मधुकरराव गवई यांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारी रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. शहरामध्ये असलेली महसूलची जुनी इमारत खंडाळा येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खंडाळा येथे जर इमारत बांधली तर गोरगरीबांसाठी हे गैरसोईचे होणार आहे. त्यामुळे जुन्या जागेवरच महसूलची नवी इमारत बांधावी. गारपिटीमुळे मेहकर तालुक्यातील हजारे शेतकºयांचे लाखे रूपयांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसान ग्रस्त शेतकºयांना हेक्टर ५० हजार रूपये मदत द्यावी, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा १५०० रूपये अनुदान मिळावे, अतिक्रमीत जागेवरील गरिबांना घरकुल देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी मधुकरराव गवई यांच्या नेतृत्वात स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मधुकरराव गवई यांच्यासह शेख युसूफ, भाई कैलास नरवाडे, सोपानराव देबाजे, मिलींद खंडारे, सुभाष गवई, विलास तुरूकमाने, संजय कळसकर, योगेश टेकाळे, संदिप गवई, रामदास आडागळे, सय्यद हारूण, रामभाऊ खंडारे, अशोक वानखेडे, वसंतराव माने, दत्ता उमाळे, उत्तम असवरमोल, संतोष अंभोरे, कन्हैय्यालाल मोरे, दामोधर भराड, देवराव नेमाडे, भगवान गवई, सुरेश अंभोरे, जाईबाई मोरे, तुळसाबाई मोरे, गुंफाबाई गवई, कुसूमबाई सुखदाने, यमुनाबाई पायघन, आश्राबाई नवघरे, सत्यभामा अंभोरे, सुमन काकडे, वच्छलाबाई राठोड, जुबेदा बी रहिम खॉ, द्वारकाबाई इंगळे, लक्ष्मी इंगळे, रूख्मीनाबाई सपकाळ, कासाबाई दाभाडे, आदींचा सहभाग होता.
मुख्यमंत्र्याच्या गाडीसमोर लोटांगण घालणार -गवई
मेहकर तालुक्यामध्ये घरकुल, सिंचन विहिरी, संजय गांधी मधील निराधार अनुदान, नुकसानग्रस्त शेतकºयांना वेळेवर मदत न मिळणे आदी मागण्यांसाठी वेळोवेळी सबंधीत अधिकाºयांकडे निवेदने दिले. मात्र अधिकाºयांकडून कोणत्याही निवेदनाची दखल घेतल्या जात नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीसमोरच लोटांगण घालणार असल्याचे मधुकरराव गवई यांनी यावेळी सांगितले.