श्री गणेशोत्सव मंडळांकडून विविध प्रात्यक्षिके सादर, अघोरी नृत्याने वेधले आबालवृध्दांचे लक्ष
By अनिल गवई | Updated: September 17, 2024 16:19 IST2024-09-17T16:18:58+5:302024-09-17T16:19:20+5:30
गणेश विसर्जन मिरवणुकीत वंदेमातरम गणेशोत्सव मंडळाने हरियाणा येथील अघोरी नृत्य पथकाला पाचारण केले.

श्री गणेशोत्सव मंडळांकडून विविध प्रात्यक्षिके सादर, अघोरी नृत्याने वेधले आबालवृध्दांचे लक्ष
खामगाव: श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत मंगळवारी श्री गणेशोत्सव मंडळांकडून विविध प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच विविध देखावेही सादर करण्यात आले. यात वंदे मातरम नवयुवक गणेशोत्सव मंडळाने सादर केलेल्या अघोरी नृत्याने आबालवृध्दांचे लक्ष वेधले.
गणेश विसर्जन मिरवणुकीत वंदेमातरम गणेशोत्सव मंडळाने हरियाणा येथील अघोरी नृत्य पथकाला पाचारण केले. या पथकाने शहरातील चौकात नृत्याचे सादरीकरण केले. स्थानिक गांधी चौकातून या सादरीकरणाला सुरूवात झाली. यामध्ये कालीमाता, बाहुबली हनुमान, महादेवाचा नंदी आणि केरळ येथील चिंपाझीची बच्चे कंपनीमध्ये चांगलीच क्रेझ दिसून आली.