हळदीकुंकूनिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:35 AM2021-02-10T04:35:11+5:302021-02-10T04:35:11+5:30

मेहकर : येथील जय परशुराम राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने ७ फेब्रुवारी रोजी विविध समजांतील महिलांसाठी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे ...

Various programs for turmeric | हळदीकुंकूनिमित्त विविध कार्यक्रम

हळदीकुंकूनिमित्त विविध कार्यक्रम

Next

मेहकर : येथील जय परशुराम राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने ७ फेब्रुवारी रोजी विविध समजांतील महिलांसाठी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात लहान-लहान चिमुकल्या मुलींनी विविध राज्यांतील वेशभूषा धारण करून कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली.

जय परशुराम राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्ष हेमाताई शर्मा, उपाध्यक्ष पूनमताई जीवन शर्मा, कोषाध्यक्ष संगीता रवी शर्मा, सदस्य नंदाताई पुरोहित, विद्याताई मिश्रा, रूपाली खांडेलवाल, आज्ञा व्यास, दमयंती बोरोटे, सुनीता व्यास, भारती भदूपोता, सावित्री दायमा, साधना भदुपोता, सुनीता शर्मा, दीपा शर्मा, सुलोचना शर्मा, पूजा पांडे, संध्या खांडेलवाल, प्रेमा शर्मा आदी महिलांनी मेहकर येथील बडा राम मंदिर येथे हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात विविध समजाच्या महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी चिमुखल्या मुलींनी महाराष्ट्र , बंगाल , गुजरात , पंजाब आदि राज्याच्या वेशभूषा परिधान केल्याने कार्यक्रमात चांगलीच रंगत आली .

Web Title: Various programs for turmeric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.