पंधरवड्यापासून वरुणराजाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:36 AM2021-08-15T04:36:16+5:302021-08-15T04:36:16+5:30

सोयाबीन तूर या मुख्य पिकावर अळीने आक्रमण केल्यामुळे पुन्हा आता शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीचा आर्थिक फटका बसत आहे. काही ठिकाणी ...

Varun Raja's rest from fortnight | पंधरवड्यापासून वरुणराजाची विश्रांती

पंधरवड्यापासून वरुणराजाची विश्रांती

Next

सोयाबीन तूर या मुख्य पिकावर अळीने आक्रमण केल्यामुळे पुन्हा आता शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीचा आर्थिक फटका बसत आहे. काही ठिकाणी तर सोयाबीन, तूर पिकाच्या जमिनीवर ओलावा नसल्यामुळे जमिनीच्या भेगा वाढत आहेत. त्यामुळे आता या परिस्थितीत वरूणराजाने कृपादृष्टी दाखवली नाही तर सोयाबीन पिकाचे उत्पन्न घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता शेतकरी हे विहीर, बोअरवेल तसेच सिंचनाचे क्षेत्रावरून स्प्रिंकलर ठिबक सिंचन यांच्या साह्याने सोयाबीन तूर या पिकाला पाणी देत आहे. लोणार गायखेड, हिरडव, आरडव, दाबा, पहुर, गुंधा, वेणी सुल्तानपूर, बीबी, किनगाव जट्टू, अजिसपूर, देवळगाव कुंडपाल,येवती, वझर, आघाव, या भागावरील सोयाबीन तूर व इतर पिकांची परिस्थिती चांगली असल्यामुळे शेतकरी हा या पिकाला जगण्यासाठी ठिबक सिंचनाच्या साह्याने पाणी देत आहे. सोयाबीन झाडाला फूल व शेंगा लागत असल्यामुळे पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. काही ठिकाणी तर उन्हाचा पारा जास्त असल्यामुळे व ढगाळ वातावरणामुळे अज्ञात रोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकरी हा पुन्हा संकटात सापडला असल्यामुळे चिंता पुन्हा वाढली आहे. जुलै महिन्यामध्ये लघू पाटबंधारे विभागाचे सिंचन तलावाचे जलसाठ्यात वाढ झाली होती. परंतु आता पंधरा दिवसाने पावसाने विश्रांती दिल्यामुळे या सिंचन क्षेत्रात सुद्धा पाण्याची पातळी कमी होताना दिसत आहे.

Web Title: Varun Raja's rest from fortnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.