विश्वगंगा नदीपात्रात आढळली पुरातन मूर्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 10:06 PM2018-04-03T22:06:30+5:302018-04-03T22:06:30+5:30

विश्वगंगा नदीपात्रात वडनेर शिवारात सुरू असलेल्या महामार्ग विस्तारीकरणाच्या खोदकामात अखंड पाषाणात कोरलेली साडेतीन ते चार फुट उंच पुरातन मुर्ती सापडली

Vastaganga river bed found in ancient idol! | विश्वगंगा नदीपात्रात आढळली पुरातन मूर्ती!

विश्वगंगा नदीपात्रात आढळली पुरातन मूर्ती!

Next

संदीप गावंडे 
नांदुरा :   विश्वगंगा नदीपात्रात वडनेर शिवारात सुरू असलेल्या महामार्ग विस्तारीकरणाच्या खोदकामात अखंड पाषाणात कोरलेली साडेतीन ते चार फुट उंच पुरातन मुर्ती सापडली. मूर्ती सापडल्याची वार्ता समजताच, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी  मुर्ती पाहण्यासाठी गर्दी केली. 
मलकापूर ते नांदुरा दरम्यान महामार्ग विस्तारीकरणासाठी माती, मुरूम उपलब्ध होण्यासाठी वडनेर येथील विश्वगंगा नदीपात्रात खोदकाम सुरू  आहे. दरम्यान मंगळवारी महामार्गावरील विश्वगंगा नदीवरील पुलापासून उत्तरेकडे एक ते दीड किलोमीटर अंतरावर वियोगी आश्रमाजवळ पोकलॅड मशीनच्या सहाय्याने खोदकाम सुरू असताना पृष्ठभागापासून जवळपास १५ फुट खाली मोठ्या दगडासारखे काही असल्याचे मशीन मालकाच्या निदर्शनास आले  . पूर्ण खोदले असता एका अखंड पाषाणात कोरलेली पुरातन मुर्ती निघाली. यावेळी काहीगावकºयांच्या मदतीत मुर्ती मोकळ्या जागेवर ठेवण्यात आली. सुरूवातीस मुर्ती भगवान गौतम बुध्दांची आहे की भगवान महावीरांची आहे यावर प्रत्यक्षदर्शींनी चर्चा केली. एव्हाना, संपुर्ण वडनेर गावात ही बाब वाºयासारखी पसरली व मुर्तीला पाहण्यासाठी नदीपात्रात गर्दी उसळली. सदर मुर्ती योग्य मानसन्मानात सकाळी सुरक्षीतस्थळी हलविणार असल्याचे माजी जि.प. सदस्य नितीन देशमुख यांनी सांगितले. 
कोट...
सदर मुर्तीच्या मागे नागाची फण आहे तसेच मांडीवर हात ठेवलेली ध्यानस्थ मुद्रा आहे. यावरून सदर मुर्ती जैन धर्माचे तेवीसावे धर्मगुरू भगवान पार्श्वनाथांची असावी, असे माझे मत आहे.
- शांतीलाल नाहर,
अध्यक्ष भारतीय जैन संघटना नांदुरा

सदर मुर्तीच्या एकंदरीत रचनेवरून मुर्ती भगवान बुध्दांची असण्याची शक्यता कमी आहे. सदर मुर्ती जैन धर्मगुरूंचीच असावी.
- अशांतभाई वानखेडे,
अध्यक्ष समतेचे निळे वादळ संघटना

Web Title: Vastaganga river bed found in ancient idol!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.