बुलढाणा : भाजप - शिवसेनेकडून वीर सावरकर गौरवयात्रा
By ब्रह्मानंद जाधव | Updated: April 6, 2023 16:02 IST2023-04-06T16:01:33+5:302023-04-06T16:02:43+5:30
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मी माफीवीर नाही, असे म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याच्या वक्तव्याचा भाजप - शिवसेनेकडून निषेधही करण्यात आला.

बुलढाणा : भाजप - शिवसेनेकडून वीर सावरकर गौरवयात्रा
लोणार : स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करणारे वीर सावरकर यांचे खरे जीवनकार्य समाजापुढे आणण्यासाठी ६ एप्रिल रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. बळिराम मापारी यांच्या नेतृत्वात लोणार शहरातून वीर सावरकर गौरवयात्रा काढण्यात आली.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मी माफीवीर नाही, असे म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याच्या वक्तव्याचा भाजप - शिवसेनेकडून निषेधही करण्यात आला.
या गौरव यात्रेमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान सानप, शहराध्यक्ष गजानन मापारी, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख भगवान सुलताने, नगरसेवक डॉ. अनिल मापारी, युवा सेना तालुका प्रमुख गजानन मापारी, शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, भाजपचे विजय मापारी, संजय दहातोंडे, उपतालुकाप्रमुख शिवकुमार तेजनकर, विजय डोईफोडे, विजय सानप, सुनील सुलताने, मारोतराव धांडे यांच्यासह भाजप-(शिंदेगट) शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.