‘स्वाभिमानीं’ने बंद पाडले भाजीपाला मार्केट!
By admin | Published: June 2, 2017 12:54 AM2017-06-02T00:54:29+5:302017-06-02T00:54:29+5:30
देऊळगावराजा : कर्जमुक्ती व शेतमालाला हमी भाव द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आवाहनानंतर अनेक शेतकऱ्यांनी संपात सहभागी झाल्याची हमी दिली.
देऊळगावराजा : कर्जमुक्ती व शेतमालाला हमी भाव द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आवाहनानंतर अनेक शेतकऱ्यांनी संपात सहभागी झाल्याची हमी दिली. स्वाभिमानीने शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये शासनाविरुद्ध घोषणा देत मार्केट बंद पाडले. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी संप पुकारल्याने भाजीपाला, दूध शहरात आणू नका, आठवडी बाजार बंद, डेअरीला दूध देऊ नका, दुधापासून, दही, ताक, तूप, खवा बनवा, कवडीमोल भावाने भाजीपाला विकू नका, असे आवाहन करीत १ जून रोजी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील भाजीपाला मार्केट बंद पाडले. यावेळी स्वाभिमानीचे नेते गजानन बंगाळे, सतीश मोरे, जितेंद्र खंडारे, गजानन मुंढे, किशोर शिंदे आदींनी राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणा देऊन भाजीपाला मार्केट बंद पाडले. यावेळी बंगाळे व मोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.