भाजीपाल्याचे भाव काेसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:05 AM2021-02-06T05:05:42+5:302021-02-06T05:05:42+5:30
दुसरबीड : गत काही दिवसांपासून भाजीपाल्याचे दर काेसळल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. परिसरातील आठवडी बाजारात सांभार, मेथी, टाेमॅटाे, फुलकाेबी, ...
दुसरबीड : गत काही दिवसांपासून भाजीपाल्याचे दर काेसळल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. परिसरातील आठवडी बाजारात सांभार, मेथी, टाेमॅटाे, फुलकाेबी, पत्ताकाेबी आदींचे भाव माेठ्या प्रमाणात घसरले.
या वर्षी पाऊस माेठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसह भाजीपाल्याची लागवड केली आहे. गत काही दिवसांपासून भाजीपाल्याचे भाव माेठ्या प्रमाणात घसरले आहेत. सांभार दहा रुपये किलाे, मेथी दाेन रुपये जुडी, टाेमॅटाे पाच रुपये किलाे, फुलकाेबी पाच रुपये किलाे, पालक दाेन रुपये जुडी या भावाने विकली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीसाठी लागलेला खर्चही निघाला नाही. भाजीपाला ताेडणी ते बाजारात आणण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च येताे. मात्र, गत काही दिवसांपासून भाव काेसळल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. लागवड व वाहतूक खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे.