लाेककलावंत विकताहेत भाजीपाला, सरकारी मदत केवळ नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:37 AM2021-08-19T04:37:59+5:302021-08-19T04:37:59+5:30
बुलडाणा : काेराेना संसर्गामुळे प्रबाेधनांचे कार्यक्रम बंद आहेत़ त्यामुळे, जिल्ह्यातील लाेककलावंत आर्थिक संकटात सापडले आहेत़ अनेक कलावंत ...
बुलडाणा : काेराेना संसर्गामुळे प्रबाेधनांचे कार्यक्रम बंद आहेत़ त्यामुळे, जिल्ह्यातील लाेककलावंत आर्थिक संकटात सापडले आहेत़ अनेक कलावंत भाजीपाला विक्री करत आहेत तर काहींना राेजंदारीवर काम करावे लागत आहे़ शासनाने या कलावंतांना मदत जाहीर केली असली तरी अजूनही मदत मिळाली नसल्याचे चित्र आहे़
गेल्या वर्षभरापासून काेराेनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे़ अनेक सामाजिक कार्यक्रमांवरही शासनाने बंदी आणली आहे़ गावाेगावी समाजप्रबाेधनाचे कार्यक्रम घेऊन लाेकांकडून मिळणाऱ्या मदतीवर लाेककलावंत आपला चरितार्थ चालवतात़ मात्र, दाेन वर्षांपासून समाजप्रबाेधन कार्यक्रमच बंद असल्याने कलावंत अडचणीत सापडले आहे़ शासनाने मदतीची घाेषणा केली असली तरी अद्यापपर्यंत एकाही कलावंतांला मदत मिळाली नसल्याचे चित्र आहे़
राज्य सरकारची मदत कधी मिळणार
राज्य शासनाने मदत जाहीर केली असली तरी सध्या कलावंतांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे़
कलावंतांना प्रबाेधन कार्यक्रम देण्यासाठी समिती स्थापन केली आहे़ या समितीचा अहवाल आल्यानंतर मदतीचे वितरण करण्यात येणार आहे़
जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे प्रबाेधन कार्यक्रम देण्याची मागणी हाेत आहे़
मदत हातात किती उरणार
शासनाने कलावंतांसाठी पाच हजार रुपये मदत जाहीर केली आहे़ त्यासाठी एका दिवसात १० ठिकाणी कार्यक्रम घेण्याची अट ठेवली आहे़
एका कार्यक्रमासाठी गाडी खर्च दाेन हजार, स्पीकरसाठी एक हजार, दहा कलावंतांचे मानधन प्रती ३०० रुपये प्रमाणे तीन हजार रुपये असा सहा हजार रुपये खर्च हाेताे़
यामध्ये भाेजन व नाश्त्याचा खर्च शिल्लकच आहे़ त्यामुळे, शासनाने जाहीर केलेली मदत ताेकडीच आहे़
शासनाने जाहीर केलेली मदत अंत्यंत ताेकडी आहे़ कार्यक्रम घेण्यासठी येणारा खर्च पाहता प्रती कार्यक्रम पाच हजार रुपये मदत देण्याची गरज आहे़ जिल्ह्यातील कलावंत आर्थिक संकटात सापडल्याने त्यांना पर्यायी कामे करावी लागत आहेत़
शाहीर डी़ आर. इंगळे
काेराेनामुळे लाेककलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहेत़ अनेकांनी पर्यायी कामे सुरू केली आहेत़ शासनाने जाहीर केलेली मदत तातडीने देण्याची गरज आहे़ तसेच दहा कार्यक्रम घेण्याची अट शिथील करावी़
शाहीर शिवाजी लहाने
सामाजिक कार्यक्रमांवर शासनाने काेराेनामुळे निर्बंध लादले आहेत़ त्यामुळे, समाज प्रबाेधन करणारे कलावंत संकटात सापडले आहेत़ शासनाने या कलावंतांना मदतीचा हात देण्याची गरज आहे़
शाहीर भगवान सिरसाट
१५ संस्थांची माहिती उपलब्ध
जिल्हा माहिती कार्यालयाकडे १५ सांस्कृतिक संस्थांची माहिती उपलब्ध आहे़ त्यामध्ये १५० कलावंतांची नावे तयार आहे़
जिल्ह्यात ८५० कलावंत मानधन घेणार आहेत़
केंद्र सरकारच्या साँग अँड डाॅमा विभागाचे दाेन संच कार्यरत आहेत़ ,
जिल्ह्यात नाेंदणीकृत आणि इतर असे १ हजार ५०० लाेककलावंत आहेत़