वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात : १५ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 14:04 IST2019-12-13T14:03:58+5:302019-12-13T14:04:13+5:30
सुदैवाने जीवित हानी टळली. मात्र १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात : १५ जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव राजा : लग्न समारंभ आटोपून नागपूर ते औरंगाबाद निघालेल्या वर्हाडाची खाजगी बस दुभाजकावर आदळल्याची घटना शहरानजीक असलेल्या नवीन वळण रस्त्यावर घडली. हा अपघात गुरुवारी सकाळी घडला. यामध्ये सुदैवाने जीवित हानी टळली. मात्र १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
लग्न समारंभ आटोपल्यानंतर नागपूरहून निघालेले वर्हाड औरंगाबादकडे खाजगी बसने जात होते. दरम्यान, बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि स्थानिक महादेव टेकडीकडे जाणाऱ्या नविन रस्त्यानजीक राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकावर ही बस आदळली. गुरुवारला सकाळी सात वाजे दरम्यान झालेल्या या अपघातात १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवित हानी टळली. अपघातातील काही जखमींना स्थानिक खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. अपघातात खाजगी बसचे नुकसान झाले आहे.
याबाबत देऊळगाव राजा पोलिसात नोंद घेण्यात आली आहे.