अवैध मांस घेऊन जाणारे वाहन पकडले
By Admin | Published: November 5, 2014 11:44 PM2014-11-05T23:44:15+5:302014-11-05T23:44:15+5:30
तिघांविरुद्ध गुन्हा : मेहकर येथे साडेतीन लाखाचा माल जप्त.
मेहकर (बुलडाणा) : अवैधरीत्या मांस घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी मेहकर ते सोनाटी रोडवर बुधवारला सकाळी ९.३0 वाजता पकडले. दरम्यान, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून ३ लाख ५0 हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. ५ नोव्हेंबर रोजी एपीआय व्ही.ए.कारेगावकर हे पोलिस कर्मचार्यांसह सोनाटी रोडवर नाकाबंदी करीत असताना टाटा एस वाहन क्रमांक एम.एच. २८ एच. ९७७१ या वाहनाची चौकशी केली असता त्यामध्ये विना परवाना अवैधरीत्या मांस वाहतूक होताना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी वाहन चालक अलीम याकद कुरेशी वय २४, वाहन मालक आसीफ नसीर कुरेशी वय ३२ व अवसर कुरेशी वय ३६ सर्व रा.मेहकर यांच्याविरुद्ध कलम ३ (१) (२) ७,९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, सहकलम १८४, ८३/१७७ मोटार वाहन कायदय़ानुसार गुन्हा दाखल केला आहे.