अग्निशमन विभागातील एक वाहन जाणार भंगारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:04 AM2021-03-04T05:04:19+5:302021-03-04T05:04:19+5:30
बुलडाणा : केंद्र सरकारने १५ वर्षांवरील सरकारी-खाजगी गाड्या भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका बुलडाणा नगरपालिकेच्या अग्निशमन ...
बुलडाणा : केंद्र सरकारने १५ वर्षांवरील सरकारी-खाजगी गाड्या भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका बुलडाणा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील एका वाहनाला बसणार आहे.
प्रदूषणात वाढ हाेत असल्याने केंद्र सरकारने अनेक उपाययाेजना केल्या आहेत. त्यामध्ये १५ वर्षांवरील वाहने भंगारात काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. बुलडाणा नगरपालिकेत १५ वर्षांपेक्षा जुने एक अग्निशमन विभागाचा बंब आहे. तसेच दाेन टॅक्टर १२ वर्षे पूर्वीचे आहेत. तसेच अग्निशमन विभागाचेच एक वाहन पाच वर्षांपूर्वीचे आहे.
जुन्या झालेल्या वाहनांचा नगरपालिकेच्या वतीने इतर कामांसाठी उपयाेग करण्यात येताे. त्यामुळे अग्निशमन बंबा केवळ आगीच्या घटना घडल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राखीव ठेवण्यात येताे. काेराेना काळात फवारणीसाठी अग्निशमन दलाच्या वाहनांचाच वापर करण्यात आला हाेता.
अग्निशमन विभागातील वाहनांची संख्या इतर विभागातील वाहने
१५ ते २० वर्षांपूर्वीची वाहने ०१ ००
१० ते १५ वर्षांपूर्वीची वाहने ०० ०२
५ ते १० वर्षांपूर्वीची वाहने ०२ ००
नगरपालिकेत १५ वर्षांपूर्वीचे एकच वाहन आहे. या वाहनाचे काय करायचे, याविषयी शासनाकडून मार्गदर्शन आल्यानंतर ठरवण्यात येणार आहे.
-स्वप्नील लघाने, उपमुख्याधिकारी, न.प., बुलडाणा
फवारणीसाठी जुन्या वाहनांचा वापर
बुलडाणा शहरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण आढळल्यानंतर त्या परिसरात फवारणी करण्यात येते. त्यासाठी जुन्या वाहनांचा वापर करण्यात येताे. नवीन वाहनांचे फवारणीमुळे नुकसान हाेत असल्याने नगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.