पेट्रोलचे दर वाढल्याने वाहनधारक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:22 AM2021-07-09T04:22:53+5:302021-07-09T04:22:53+5:30

जिल्ह्यात पेट्रोलचे दर १०६ रुपये लिटर आहे़ महागाईतही प्रचंड प्रमाणावर वाढ होत आहे़ सर्वसामान्य जनतेची यातून सुटका ...

Vehicle owners in crisis due to increase in petrol prices | पेट्रोलचे दर वाढल्याने वाहनधारक संकटात

पेट्रोलचे दर वाढल्याने वाहनधारक संकटात

Next

जिल्ह्यात पेट्रोलचे दर १०६ रुपये लिटर आहे़ महागाईतही प्रचंड प्रमाणावर वाढ होत आहे़ सर्वसामान्य जनतेची यातून सुटका होणार का, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षापासून सर्वत्र लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. त्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे, तर अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अशातच पेट्रोल, डिझेल वाढीमुळे महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोलचे दर १०६ रुपयांवर गेल्याने दिवसभर काम करून ३०० कमावणाऱ्या सर्वसामान्यांना वाहन चालवणे न परवडणारे ठरत आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीने मालवाहतुकीचा खर्च वाढला आहे. यामुळे भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. याचबरोबर स्वयंपाक गॅसच्या किमतीत ही २५ रुपयांनी वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लाेकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Web Title: Vehicle owners in crisis due to increase in petrol prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.