प्रदूषण चाचणीला वाहनधारकांचा ‘खाे’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:33 AM2020-12-31T04:33:08+5:302020-12-31T04:33:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : वाढत्या प्रदूषणामुळे वाहनांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात विविध प्रकारची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : वाढत्या प्रदूषणामुळे वाहनांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात विविध प्रकारची ४ लाख ९१ हजार २१६ वाहने असून यातील केवळ ७० हजार वाहनांनीच अशी प्रमाणपत्रे घेतली आहेत. त्यामुळे प्रदूषणात वाढ हाेत आहे.
गत काही वर्षांत लाेकसंख्यावाढीबराेबरच वाहनांच्या संख्येतही माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काेराेनामुळे अनेकांनी बसने प्रवास करणे टाळले आहे. त्यामुळे नागरिक आपआपल्या स्थितीनुसार दुचाकी किंवा चार चाकी वाहने खरेदी करीत आहेत. गत सहा महिन्यांत माेठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी करण्यात आली. मात्र ज्यांनी याआधी वाहने खरेदी केली आहेत त्यांनी मुदत संपूनही आपल्या वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी केलेली नाही. जिल्ह्यात एकूण ४ लाख ९२ हजार २१६ वाहने धावतात. यामध्ये ३ लाख ८७ हजार १४५ दुचाकींचा समावेश आहे. यापैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त दुचाकीस्वारांनी प्रदूषण नियंत्रण चाचची केली नसल्याचे चित्र आहे. पीयूसी नसल्यास दंड माेठ्या प्रमाणात आहे. त्या तुलनेत पीयूसीचा खर्च अल्प असूनही वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करतात.
पीयूसी केली नाही म्हणून
केवळ १६६७ वाहनांना दंड
प्रदूषण नियंत्रण चाचणी न करणाऱ्या केवळ १ हजार १६७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पीयूसी असूनही सादर न केल्यास किंवा सात दिवसांत सादर केल्यास २०० रुपये दंड आहे. तसेच ज्यांच्याकडे पीयूसीच नाही अशांना १ हजार हजार रुपये दंड करण्यात येताे. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० पर्यंत १,३१२ वाहनांवर कारवाई करून ३ लाख ३५ हजार २०० तर एप्रिल ते नाेव्हेंबर या कालावधीत ३५५ वाहनांवर कारवाई करून १ लाख ४५ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहनांची संख्या वाढल्याने प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र वाहनांसाठी घेणे गरजेचे आहे. पीयूसी नसलेल्या वाहनांना एक हजार रुपये तर सात दिवसांत सादर केल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येताे. वाहनधारकांनी आपल्या वाहनाची पीयूसी करून घ्यावी. तसेच पीयूसी संचालकांना नियमानुसारच पैसे द्यावेत.
- गाेपाल वराेकार, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा