वाहन कर भरण्याची सुविधा आता घरबसल्या
By admin | Published: January 6, 2015 12:06 AM2015-01-06T00:06:32+5:302015-01-06T00:06:32+5:30
वाहन परवाना काढण्यासाठीसुद्धा ऑनलाईन
बुलडाणा : प्रादेशिक परिवहन कार्यालय संगणकीकृत झाल्यानंतर आता वाहन परवाना काढण्यासाठीसुद्धा ऑनलाईन पद्धतीचा वापर सुरू करण्यात आला आहे. या पाठोपाठ आता वाहनकरसुद्धा ऑनलाईन भरण्याची सुविधा प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सुरू होणार असल्याने या कार्यालयात चकरा मारण्याची वेळ आता नागरिकावर येणार नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालयात संगणकीकरण झाल्यानंतर केवळ वाहन परवाना काढण्यासाठी ऑनलाईन परीक्षा सुरू करण्यात आली हाती. त्यासाठी लिखित अर्ज भरून द्यावा लागत होता. त्यानंतर वेगवेगळे गट करून एका हॉलमध्ये डिजिटल स्क्रिनवर हा पेपर सोडविल्या जातो. या प्रक्रियेसाठीसुद्धा परवाना काढणार्यांना रांगा लावाव्या लागत होत्या; मात्र अर्ज भरण्याची पद्धती बदलविण्यात आली आहे. घरी बसून किंवा नेट कॅफेवर जाऊन प्रादेशिक परिवहन विभागाची वेबसाईड उघडून ऑनलाईन अर्ज भरू न द्यायचा. त्यानंतर उमेदवाराला परीक्षेची तारीख मिळेल, त्या तारखेवर परिवहन कार्यालयात जाऊन परीक्षा द्यायची. ही पद्धत सुरू झाल्यापासून परिवहन कार्यालयात होणारी गर्दी कमी झाली आहे.
*अशी आहे ऑनलाईन पद्धत
संगणकीकृत प्रणालीचा एक भाग म्हणून आता वाहनकर ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा लवकरच प्रादेशिक परिवहन कार्यालय उपलब्ध करून देणार आहे. ज्यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीची सुविधा नाही, अशांना मात्र शासनाने ठरवून दिलेल्या बँकांमध्ये कराचा भरावा लागणार आहे. यासाठी ग्रॉस वेबसाईटचा वापर वाहनधारकांना करावा लागणार आहे. त्यासाठी एक्रॉस द बँक काऊंटर युर्जस पासवर्डचा वापर वाहनधारकांना करावा लागणार आहे. ज्यांच्याकडे ऑनलाईन पेमेंट सुविधा आहे, त्यांना हा कर भरणे सुलभ होणार आहे.