वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाने पोलिसास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:34 AM2020-04-29T10:34:14+5:302020-04-29T10:36:45+5:30

या घटनेत पोलिस शिपाई जागीच ठार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

A vehicle transporting sand illegally crushed the police | वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाने पोलिसास चिरडले

वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाने पोलिसास चिरडले

googlenewsNext
ठळक मुद्देगुरूवारी पहाटे ४ वाजता दरम्यान ही घटना घडली. उमेश सिरसाट यांना रेती वाहतूक करणाºया टिप्परने जबर धडक  दिली.उमेश सिरसाट हे बुलडाणा नजीकच्या भादोला येथील रहिवासी.

जलंब: अवैध रेती वाहतूक करणाºया टिप्परने जलंब पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत एका पोलिस शिपायास उडविले. गुरूवारी पहाटे ४ वाजता दरम्यान ही घटना घडली. या घटनेत पोलिस शिपाई जागीच ठार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जलंब पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या उमेश सिरसाट यांना रेती वाहतूक करणाºया टिप्परने जबर धडक  दिली. माटरगाव-जलंब येथील पुर्णा नदीच्या पात्रातून मोठ्याप्रमाणात अवैध रेतीचा उपसा करण्यात येतो. गुरूवारी पहाटे रेतीचे टिप्पर जात असताना हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात ठार झालेले पोलिस उमेश सिरसाट हे बुलडाणा नजीकच्या भादोला येथील रहिवासी असल्याचे समजते.

Web Title: A vehicle transporting sand illegally crushed the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.