मजूरांना घेऊन जाणारे वाहन उलटले; २० जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 11:42 AM2020-10-21T11:42:35+5:302020-10-21T11:42:59+5:30

Accident near Shegaon बैल गाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला

Vehicles carrying laborers overturned Near Shegaon; 20 injured | मजूरांना घेऊन जाणारे वाहन उलटले; २० जण जखमी

मजूरांना घेऊन जाणारे वाहन उलटले; २० जण जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
शेगाव : शेगाव -कालखेड मार्गावर परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारे चारचाकी वाहन उलटले. या अपघातात २० मजूर जखमी झाले असून पैकी दोन गंभीर आहेत. ही  घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान घडली. 
शेगाव येथील एमएच-२८,एबी-०७१४ या क्रमांकाच्या वाहनातून मजूर सकाळी कालखेड रोडवरील एका शेतात सोयाबीन सोंगण्यासाठी हे मजूर जात होते.  शहरानजीक काही अंतरावर बैल गाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे वाहन उलटून हा अपघात झाला. जखमींना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात  उपचारासाठी हलविण्यात आले. दोन गंभीर जखमी रुग्णाना तात्काळ पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.  
या अपघाताने पुन्हा एकदा मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मजुरीसाठी मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात ५० च्या जवळपास आलेले मजूर शेगाव तालुक्यातील मानेगाव येथे राहत होते. त्या मजुरांना घेऊन जाताना वाहन उलटले.  यावेळी सईबाई मोटे सामान्य रुग्णालयातील  तज्ञ डॉक्टर गायब होते. रूग्णालयातील अधिकारी व महत्वाचे डॉक्टर मुख्यालयीन राहत नसल्यामुळे रुग्णांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथीलही परिस्थिती त्वरित सुधारण्याची गरज असून जखमींच्या  नातेवाईकांनी तशी मागणी केली.

Web Title: Vehicles carrying laborers overturned Near Shegaon; 20 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.