वरातीत नाचणाऱ्या तरुणांना भरधाव वाहनाने उडवले; दोन ठार, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 09:20 PM2021-01-03T21:20:50+5:302021-01-03T21:22:55+5:30

Accident News एकाचा जागीच मृत्यू, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान अकोला येथे मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान टेंभूर्णा येथे घडली.

Vehicles hit dancing men at the wedding; Two killed! | वरातीत नाचणाऱ्या तरुणांना भरधाव वाहनाने उडवले; दोन ठार, तीन जखमी

वरातीत नाचणाऱ्या तरुणांना भरधाव वाहनाने उडवले; दोन ठार, तीन जखमी

Next
ठळक मुद्देनवरदेवासह वऱ्हाडी दर्शनासाठी मेहकर रोडवरील मारोतीच्या मंदिरात जात होते. वाहनचालक दत्तात्रय गोविंदराव पाचपोर याने प्रवाशी वाहन वऱ्हाड्यांच्या अंगावर घातले.चान्नी येथील गजानन किसन टाले (वय ३२) यांचा जागीच मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभूर्णा : नवरदेवाची वरात मंदिरात जाताना समोर नाचणाऱ्या वऱ्हाड्यांना भरधाव वाहनाने उडवल्याने एकाचा जागीच मृत्यू, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान अकोला येथे मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान टेंभूर्णा येथे घडली. अपघातात दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी वाहनचालक पसार झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी वाहनाची तोडफोड केली.
   अकोला जिल्ह्यातील सावरगाव येथील ज्ञानेश्वर वासुदेव पायघन याच्या लग्नासाठी रविवारी सकाळी वऱ्हाडमंडळी टेंभूर्णा येथे पोहोचली होती. गावातील काशिराम काेळसे यांच्या मुलीसोबत लग्न ठरले होते. दरम्यान नवरदेवासह वऱ्हाडी दर्शनासाठी मेहकर रोडवरील मारोतीच्या मंदिरात जात होते. यावेळी ३० ते ४० वऱ्हाडी रस्त्यावर उपस्थित असताना शिर्ला नेमाने येथील वाहनचालक दत्तात्रय गोविंदराव पाचपोर याने प्रवाशी वाहन क्रमांक एमएच-२८ व्ही-३०४३ भरधाव चालवून वऱ्हाड्यांच्या अंगावर घातले. त्यामध्ये  चान्नी येथील गजानन किसन टाले (वय ३२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमोल शामराव वाट (वय २२) याचा उपचारादरम्यान खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.  सोपान हिरळकर (वय १८) रा.चान्नी, आनंद दत्तात्रय बोराडे (वय ११) इतर अमोलवार (वय २१) हे जखमी झाले आहेत. यावेळी गर्दीचा फायदा घेत वाहनचालक पसार झाला. त्याचवेळी जमावाने दुसराच व्यक्ती चालक असल्याचे समजून त्याला बेदम मारहाण केली.
 यावेळी गावात प्रचंड गदाराेळ निर्माण झाला होता. अपघातातील         जखमींना उपचारासाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले. सखाराम पुंजाजी पायघन यांच्या तक्रारीवरुन चालक दत्तात्रय पाचपोर याच्यावर गुन्हा  दाखल करण्यात आला.  याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत              आहेत. 

Web Title: Vehicles hit dancing men at the wedding; Two killed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.