रोजगार हमी योजना कामाची होणार पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 04:15 PM2020-10-07T16:15:49+5:302020-10-07T16:15:55+5:30

दोन महिन्यात अभ्यास करून या समितीला त्यांचा अहवाल द्यावा लागणार आहे.

Verification of employment guarantee scheme work | रोजगार हमी योजना कामाची होणार पडताळणी

रोजगार हमी योजना कामाची होणार पडताळणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राज्यात सुरू असलेल्या रोजगार हमी योजना राबवण्यासाठी नवे बदल तसेच मनुष्यबळाच्या गरजेसंदर्भात अहवाल देण्याची जबाबदारी शासनाने अभ्यासगट समितीवर टाकली आहे. ५ आॅक्टोबर रोजीच्या आदेशानुसार गठित समिती येत्या दोन महिन्यात तसा अहवाल शासनाला देणार आहे.
रोजगार हमी योजनेतील कामकाजाचा अभ्यास करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास समितीकडून केला जाणार आहे. त्यामध्ये निवृत्त प्रधान सचिव व्ही. गिरीराज अध्यक्ष आहेत. तर निवृत्त उपसचिव वि. पू. काळे सदस्य, रोजगार हमी योजनेच्या उपसचिव श्रीमती वरखाडे सदस्य सचिव आहेत. सदस्य म्हणून रोहयोचे सहाय्यक संचालक विजयकुमार कलवले यांचा समावेश आहे. दोन महिन्यात अभ्यास करून या समितीला त्यांचा अहवाल द्यावा लागणार आहे. सुधारीत आकृतीबंधाची ही चाचपणी आहे.

 

 

Web Title: Verification of employment guarantee scheme work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.