पहिल्याच दिवशी १७ पोलीस ठाण्यांची ‘डायरी’ कोरी
By admin | Published: January 2, 2015 12:51 AM2015-01-02T00:51:02+5:302015-01-02T00:51:02+5:30
नववर्षाच्या पहिल्या दिवशी १६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नाही.
बुलडाणा: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचा रात्री उशिरा राउंडअप घेतला असता, १६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नसल्याचे दिसून आहे. उरलेल्या १0 पोलीस ठाण्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात गुन्हे नोंदविले गेले असून, महिलेच्या विनयभंगा पासून तर चोरी, मारहाण व अपघाताच्या घटना घडल्या आहेत. पोलीस स्टेशनमध्ये डायरी अतिशय महत्त्वाची असते. परिसरात घडणार्या प्रत्येक गुन्ह्याची नोंद सदर डायरीत नोंदविली जात असल्याने ही डायरी म्हणजे त्या परिसरातील गुन्हेगारीचे स्वरूप अन् सामाजीक स्वास्थ दर्शविणारे दिशादर्शक असते. सन २0१४ मध्ये गुन्हेगारीने डोके वर काढले होते. चोर्या व महिला अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ झालेली होती. त्यामुळे सन २0१५ मध्ये गुन्ह्याचे प्रमाण घटले पाहिजे ही सर्वांंचीच अपेक्षा आहे.
*गुन्ह्यांची नोंद नसलेली ठाणी
नववर्षाच्या पहिल्या दिवशी रात्री उशिरा जिल्ह्यातील, बुलडाणा ग्रामीण, डोणगाव, धामणगाव बढे, अंढेरा, हिवरखेड, पिंपळगाव राजा, जलंब , मलकापूर ग्रामीण, लोणार, किनगाव राजा, जानेफळ, साखरखेर्डा, डोणगाव, सिंदखेडराजा, तामगाव पोलीस ठाण्यात एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.