बैलजोडी चोरण्याचे आरोपावरून पती-पत्नी व मुलास मारहाण

By admin | Published: June 4, 2017 01:33 PM2017-06-04T13:33:28+5:302017-06-04T13:33:28+5:30

२१ जणांवर अ‍ॅक्ट्रासिटीसह विविध गुन्हे दाखल

The victim and the boy were beaten by the accused for stealing bullocks | बैलजोडी चोरण्याचे आरोपावरून पती-पत्नी व मुलास मारहाण

बैलजोडी चोरण्याचे आरोपावरून पती-पत्नी व मुलास मारहाण

Next

२१ जणांवर अ‍ॅक्ट्रासिटीसह विविध गुन्हे दाखल
धाड : ग्राम रूईखेड मायंबा येथील एका शेतकऱ्याचे शेतातील गोठ्यातून
बैलजोडी चोरून नेल्याचा प्रयत्न करण्याचे आरोपावरून येथील पती, पत्नी व
मुलास रूईखेड मधील काही लोकांनी मारहाण केली. या घटनेत महिलेने दिलेल्या
तक्रारीवरून रूईखेड मधील २१ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात
येवून संबंधितावर अ‍ॅक्ट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली ३ जून रोजी गुन्हा
नोंदविण्यात आला.
बुलडाणा तालुक्यातील ग्राम रूईखेड मायंबा या गावातील फिर्यादी राधाबाई
गुलाबराव उंबरकर (वय ५०) या महिलेने धाड पोलिसात तक्रार दिली की, २ जून
रोजी रात्री ८.३० च्या सुमारास रूईखेड गावाकडे घरी जाताना वाटेत, आरोपी
सुखराम रामराव उगले, विजय तेजराव उगले व इतर १९ जणांनी मला व पतीस आणि
मुलास बैलजोडी चोरण्याच्या आरोपावरून लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत विनयभंग
केला. सोबत मारहाण करून जातीवाचक शिव्या देवून जिवे मारण्याच्या धमक्या
दिल्या. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर कलम १४३, ३५४, ३५४ (ख), ३२४,
३२३, १४३, १४७, १४८, २९४, ५०६ तसेच २, ३, अनुसुचित जाती जमाती अत्याचार
प्रतीबंधक कायद्यानुसार १९८९ नुसार गुन्हा नोंद केला. या घटनेतील २१
आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. तर मारहाणीत जखमी राधाबाई
उंबरकर व रविंद्र उंबरकर यांचेवर रूग्णालयात उपचार सुरू आहे.  तर सुखराम
उगले यांनी धाड पोलिसात तक्रार दिली की, आरोपी रविंद्र गुलाबराव उंबरकर व
राधाबाई उंबरकर आणि गुलाबराव उंबरकर यांनी माझ्या शेतातील गोठ्यातून
बैलजोडी चोरण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रत्यक्ष पकडले, विचारणा
केली असता त्यांनी शिवीगाळ केली वरून पोलिसांनी आरोपींवर कलम ३८०, ४५७,
५११ भादवी नुसार गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी एसडीपीओ बी.बी.महामुनी
यांनी घटनास्थळाला भेट देवून माहिती घेतली. तर तपास बी.बी.महामुनी यांचे
मार्गदर्शनात ठाणेदार संग्राम पाटील, एएसआय गजानन मुंढे, ना.पो.कॉ.
प्रकाश दराडे, माधव कुटे, विजय मेहेत्रे, गजानन मोरे, दशरथ शितोळे,
बळीराम खंडागळे हे करत आहे. (वार्ताहर)

Web Title: The victim and the boy were beaten by the accused for stealing bullocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.