विदर्भ पंढरीत भक्तांची मांदियाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:23 AM2017-11-01T00:23:45+5:302017-11-01T00:23:47+5:30

शेगाव : विदर्भ पंढरी संतनगरीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रींच्या मंदिरात कार्तिक एकादशी सोहळा ३१ ऑक्टोबरला श्रींच्या पालखी नगर परिक्रमेसह व कीर्तन प्रवचनद्वारे साजरा करण्यात आला.

Vidarbha Pandhite devotees pray! | विदर्भ पंढरीत भक्तांची मांदियाळी!

विदर्भ पंढरीत भक्तांची मांदियाळी!

Next
ठळक मुद्देकार्तिक एकादशीनिमित्त श्रींची नगर परिक्रमा

गजानन कलोरे। 
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : विदर्भ पंढरी संतनगरीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रींच्या मंदिरात कार्तिक एकादशी सोहळा ३१ ऑक्टोबरला श्रींच्या पालखी नगर परिक्रमेसह व कीर्तन प्रवचनद्वारे साजरा करण्यात आला.
श्रींच्या रजतमुखवट्यांचे पूजन विश्‍वस्त नीळकंठदादा पाटील यांच्या हस्ते करुन श्रींची पालखी दु.२ वाजता नगरपरिक्रमेकरिता निघाली. याप्रसंगी विश्‍वस्त नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे, पंकज शितुत, विश्‍वेश्‍वर त्रिकाळ, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक रामेश्‍वर काठोळे, राजेंद्र शेगोकार, शरद शिंदे उपस्थित होते. श्रींच्या पालखी समवेत गज, अश्‍व, टाळकरी, पताकाधारी वारकर्‍यांचा सहभाग होता.
 प्रगटस्थळी विश्‍वस्त गोविंदराव कलोरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सीतामाता मंदिर येथे विश्‍वस्त विश्‍वेश्‍वर त्रिकाळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शीतलनाथ महाराज संस्थानच्या समोरुन श्रींची पालखी गेली असता विश्‍वस्त नीळकंठदादा पाटील यांनी शीतलनाथ महाराज पूजन नारळ, दुपट्टा आदीद्वारे पूजन केले. यावेळी शीतलनाथ महाराज संस्थानचे विश्‍वस्त तुळशीदास पिंपळे, पुष्पाकर काठोळे, मोहन हुसे, पर्‍हाडे यांनी श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन केले. श्रींच्या पालखी मार्गावर  भाविकांनी रांगोळ्या काढून व पूजन करुन दर्शन शिस्तीत घेतले. श्रींचे भक्त श्रावण पांडे यांनी चहाचे तसेच विश्‍वस्त किशोर टाक यांनी पालखीत सहभागी वारकर्‍यांना चहाचे वितरण केले.
श्रींच्या पालखीत गजलक्ष्मी ही भक्तांचे आकर्षण ठरली. शिस्तीत पांढर्‍या शुभ्र वेशातील टाळकरी व पदाधिकारी शिस्त मार्गस्त होत होते याच्या समवेत श्री गजानन महाराज संस्थानचे विश्‍वस्त नीळकंठदादा पाटील, नारायणराव पाटील, विश्‍वंभर त्रिकाळ, गोविंदराव कलोरे, पंकज शितूत, महाविद्यालयाचे शरद शिंदे, रामेश्‍वर काठोळे, आदी मान्यवर सहभागी झाले होते. श्रींची पालखी नगर परिक्रमा करत संध्याकाळी मंदिरात दाखल झाली. यावेळी श्रींच्या भक्तांना टाळकरी यांचा रिंगण सोहळा  झाला. यावेळी ‘विठ्ठल माझा माझा गजानन माझा माझा’ या अभंगाने मंदिर परिसर दुमदुमला होता. संध्याकाळी महाआरती झाली.

७५ हजार भाविकांना फराळाचे वाटप !
श्रीं गजानन महाराज संस्थानच्यावतीने ७५ हजार भाविकांना उपवासाचे फराळांचे शिस्तीत वाटप करण्यात आले. यात ७५ क्विंटल साबुदाणा उसळ वाटप झाले. यात १५ क्विंटल शेंगदाणे, १0 क्विंटल पोहा चिवडा, खाद्यगोड तेल, ७५ हजार केळी, ७0 कन्टेनर आमटी, आदी साहित्य वाटप करण्यात आले.

एसटी महामंडळाकडून जादा बसेस
शेगाव आगाराच्या ७0 हजाराच्या वर एकदिवस कार्तिक एकादशीनिमित्त शेगावात दाखल झालेल्या भक्तांकरवी अतिरिक्त उत्पन्न मिळाले. यात जळगाव ३ गाड्या, शेगाव अकोट २ गाड्या, शेगाव-खामगाव २ गाड्या, शेगावच्या कार्तिक एकादशीनिमित्त जादा सोडण्यात आल्या होत्या. 

Web Title: Vidarbha Pandhite devotees pray!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.