विदर्भ राज्य आंदोलन समितीचा ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 03:55 PM2020-02-12T15:55:22+5:302020-02-12T15:55:33+5:30
मलकापूर येथे मंगळवारी स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने तहसील चौकात रास्ता रोको करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : विदर्भातील सर्व जनतेचे विज बिल निम्मे करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी मलकापूर येथे मंगळवारी स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने तहसील चौकात रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भातील जनतेचे वीज बील निम्मे करा, स्वतंत्र विदर्भ राज्य-झालेच पाहिजे, शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा-झालाच पाहिजे. अश्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्ता ेउपस्थित होते.
मलकापूर येथे झालेल्या आंदोलनात दामोदर शर्मा, रणजितभाऊ डोसे, बाबुराव पाटील, बाबुराव संबारे, दिलीपसिंह राजपूत, सोनाजी गव्हाळे, सोपान सपकाळ, भागवत बोरले, आत्माराम बगाडे, दिलीपसिंह जाधव, कुंजीलाल धुत, नामदेव किनगे, गजानन तायडे, मुजाहदऊल्लाखां, ज्ञानेश्वर सातव, वामनराव राणे, अनिल चंदनशिव, मनोहर बोपले यांच्यासह स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या घोषणा दिल्या. (तालुका प्रतिनिधी)