विदर्भ राज्य निर्मितीसाठी आंदोलन छेडणार - चटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:22 AM2021-07-22T04:22:15+5:302021-07-22T04:22:15+5:30
स्थानिक पत्रकार भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला विदर्भ प्रदेशच्या महिला आघाडी अध्यक्ष ...
स्थानिक पत्रकार भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला विदर्भ प्रदेशच्या महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश वानखेडे, युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, सुखदेव नरोटे, अेांकार घुबे, प्रल्हादराव निराघठे, बेबी शर्मा, दिनकर वाकोडे, वामनराव जाधव, देवीदास कणखर, दामोदर शर्मा, विलास मुलमुले, तेजराव मुंडे, रमेशसिंह चव्हाण, ॲड. सुभाष विणकर, सुखदेव नागरे, मुरली येवले, प्रल्हाद बाजड, डाॅ. विजय डागा, बी. बी. चौधरी यांच्यासह अन्य उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना चटप म्हणाले की, स्वतंत्र राज्याची निर्मिती व्हावी, कोरोना काळातील संपूर्ण वीज देयके सरकारने भरावे, इंधन दरवाढ मागे घ्यावी, या मागण्यांसाठी ९ ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये हे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. विदर्भातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विदर्भ चंडीका देवीला साकडे घालून महाआरती करून दुपारी एक वाजता ९ ऑगस्ट रोजी या ठिय्या आंदोलनाची सुरुवात होईल, असे ते म्हणाले.
--विदर्भ राज्याच्या मागणीस बगल--
१९९७ मध्ये भुवनेश्वर येथील कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपने वेगळ्या विदर्भाचा ठराव घेतला होता. अटलजींनी उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या तीन राज्यांची निर्मिती केली. परंतु विदर्भ राज्य दिले नाही. विदर्भाच्या जनतेवर भाजपने त्यावेळी अन्याय केला. २०१४ मध्येही भाजपने दिलेले आश्वासन पाळले नाही. केंद्राला राज्य निर्मितीचे अधिकार असतानाही या मागणीकडे भाजप नेते दवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुर्लक्ष केले. ६० वर्षे सत्तेत राहूनही काँग्रेसने विदर्भ राज्य दिले नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी पक्षांनी विदर्भातील नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
--आंदोलन तीव्र करणार--
ऑगस्ट क्रांती दिनापासून सुरू होणारे ठिय्या आंदोलन विदर्भस्तरीय राहणार आहे. केंद्रातील भाजपच्या सरकारने विदर्भ राज्य न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा चटप यांनी यावेळी बोलताना दिला. १५ ऑगस्टपर्यंत ठिय्या आंदोलन नागपूरमध्ये सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.