VIDEO : जून 2017 पर्यंत अपूर्ण विहिरींचे कामे होणार पूर्ण
By Admin | Published: November 10, 2016 02:25 PM2016-11-10T14:25:48+5:302016-11-10T14:29:33+5:30
ऑनलाइन लोकमत हर्षनंदन वाघ/ बुलडाणा, दि 10 - शेतक-यांना शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण होऊन दुबार पीक घेणे सुलभ व्हावे ...
ऑनलाइन लोकमत
हर्षनंदन वाघ/ बुलडाणा, दि 10 - शेतक-यांना शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण होऊन दुबार पीक घेणे सुलभ व्हावे तसेच उत्पादकताही वाढावी यासाठी पंतप्रधान पॅकेज अंतर्गंत सिंचन विहिर योजन सुरू केली होती. मात्र मंजूर विहिरींपैकी अनेक विहिरींचे कामे अपूर्ण असल्यामुळे त्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून अपूर्ण असलेल्या विहिरी पूर्ण करण्याचे आदेश दिले. याचा 840 लाभार्थ्यांना फायदा होणार आहे.
पंतप्रधान पॅकेजअंतर्गंत विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी सिंचन विहीर योजना सुरू करण्यात आली होती. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्याला 16 हजार 900 सिंचन विहिरींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 13 हजार 547 विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र काही विहिरींचे काम सुरू न झाल्यामुळे तर काही ठिकाणी कामे अपूर्ण असल्यामुळे 4 हजार 526 विहिरी रद्द करण्यात आल्या होत्या.
दरम्यान सिंचन विहिरींसाठी खर्च 1 लाखावर 2 लाख 50 हजार रूपये देण्याचे शासनाने ठरवले. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाकडे अपूर्ण विहिरींचे कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यानंतर जून 2016 पर्यंत अपूर्ण असलेल्या 1 हजार 946 विहिरींचे काम पूर्ण करण्याची परवानगी मिळाली. त्यानुसार 1 हजार 106 विहिरींचे काम पूर्ण करण्यात आले. तर उर्वरित 840 सिंचन विहिरींचे काम पूर्ण करण्यासाठी जून 2017 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
अपूर्ण विहिरींचे काम पूर्ण करण्याचे आवाहन
बुलडाणा जिल्ह्यात जून 2017 पर्यंत 840 अपूर्ण विहिरींचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात येणार असून विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. अर अपूर्ण विहिरी असलेल्या शेतक-यांना विहिरींचे काम पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील अपूर्ण विहिरींची संख्या
बुलडाणा - 50
चिखली - 81
देऊळगाव राजा - 25
जळगाव जामोद - 37
खामगाव - 10
लोणार - 104
मलकापूर - 112
मेहकर - 36
मोताळा - 140
नांदूरा - 150
संग्रामपूर - 14
शेगाव - 25
सिंदखेड राजा - 56
https://www.dailymotion.com/video/x844hgr