VIDEO : बुलडाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील जैवविविधता धोक्यात

By Admin | Published: November 8, 2016 03:45 PM2016-11-08T15:45:06+5:302016-11-08T16:16:18+5:30

 ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 8 - ज्ञानगंगा अभयारण्यात गेल्या काही वर्षांपासून अखाद्य वनस्पतींचे अतिक्रमण वाढत असल्यामुळे पारंपरिक गवत नामशेष ...

VIDEO: Danger Biodiversity in Gyanganga Wildlife Sanctuary | VIDEO : बुलडाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील जैवविविधता धोक्यात

VIDEO : बुलडाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील जैवविविधता धोक्यात

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 8 - ज्ञानगंगा अभयारण्यात गेल्या काही वर्षांपासून अखाद्य वनस्पतींचे अतिक्रमण वाढत असल्यामुळे पारंपरिक गवत नामशेष होत आहे. अखाद्य वनस्पती प्राणी खात नाहीत तसेच यामध्ये एकही सजीव वास्तव्य करीत नसल्यामुळे हे
जंगल निर्जिव होण्याच्या मार्गावर आहे. या गंभीर प्रकाराकडे वनविभागाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. यावर पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
 
जिल्ह्यातील २००.५ हेक्टरवर ज्ञानगंगा अभयारण्य पसरलेले आहे.  जंगलामध्ये हरिण, काळविट, नीलगाईंसह अनेक तृणभक्षी प्राणी वास्तव्यास आहेत. घनदाट असलेल्या या अभ्यारण्यात पूर्वी गवताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. यामुळे  येथे तृणभक्षी प्राणी वास्तव्यास होते. त्यामुळे मांसभक्षी प्राण्यांचीही संख्या वाढली होती.
 
या जंगलात माखले, शहाळा, पवत्या, तिखाडी हे नैसर्गिक गवत आहे. हे खाद्य गवत असून, यामध्ये विविध जीव, जंतूंसह नाकतोडे, फूलपाखरू यांचेदेखील वास्तव्य आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या अभयारण्यात अखाद्य वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. अखाद्य वनस्पतीमध्ये रानतुळस, तरोटा, फुली यांचा समावेश आहे. रानतुळस ही वनस्पती झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. 
 
ही वनस्पती कोणताही प्राणी खात नाही. शिवाय, या वनस्पतीचा उग्र वासदेखील येतो. त्यामुळे  ही वनस्पती असलेल्या भागात प्राणी वास्तव्यही करीत नाही. यासोबतच रानतुळस असलेल्या जमिनीवर दुसरे कोणतेही गवत उगवत नाही. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील जंगल हिरवे दिसत असले तरी निर्जिव झाले आहे. तसेच जैवविविधताही संपुष्टात येत आहे.
 
 
ज्ञानगंगा अभयारण्यातून गवतच नामशेष होत असल्यामुळे येथील हरिण, नीलगाय हे जंगला लगतच्या शेतांमध्ये असलेल्या पिकांकडे वळले आहेत. परिणामी पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतक-यांच्या शेकडो हेक्टरवरील पिके हरिण आणि नीलगाय फस्त करत आहेत.  तृणभक्षी प्राणी जंगलातून बाहेर आल्यामुळे मांसभक्षी प्राणीदेखील जंगलाबाहेर येत आहेत. त्यामुळे अस्वलाच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटनादेखील समोर आली आहे. तसेच बिबट्याच्या हल्ल्याच्याही घटना घडल्या आहेत.  
 
वनविभागाच्या उपाययोजना शून्य
एका वर्षापूर्वी वनविभागाच्या ट्रॅप कॅमे-यामध्ये ज्या ठिकाणी सर्वत्र केवळ गवतच असल्याचे छायाचित्र काढण्यात आले आहे. त्या ठिकाणी आता केवळ रानतुळसच दिसत आहे. ही समस्या गंभीर असली तरी याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. रानतुळसचे प्रमाण कमी करण्याकरिता किंवा यावर नियंत्रण मिळविण्याकरिता वनविभागाच्यावतीने आतापर्यंत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.
 
अस्वलांचे खाद्य संपुष्टात
अस्वलाचे मुळ खाद्य कंदमूळ आहे. सोबतच अस्वल वारूळातील मुंग्या, उदई, किटकदेखील खातात. रानतुळस ही दाट पसरते व त्याचा अत्यंत उग्र वास येतो. त्यामुळे या भागात कोणतेही किटक नाहीत. परिणामी अस्वलाचे खाद्यही रानतुळसमुळे संपुष्टात येत आहे.
 
अभायरण्य प्रशासनाकडून  लवकरच पाऊल उचलणार 
'ज्ञानगंगा अभयारण्यातील रानतुळस वाढत असून गवताचे क्षेत्र कमी होत आहे. ही गंभीर बाब आहे. रानतुळस कोणत्याही प्राण्याचे खाद्य नाही. वनविभाग याबाबत लवकरच पावले उचलणार आहे', असे ज्ञानगंगा अभयारण्यचे एससीएफ पोळ यांनी सांगितले आहे. 
 

 

https://www.dailymotion.com/video/x844h7s

Web Title: VIDEO: Danger Biodiversity in Gyanganga Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.