VIDEO : ज्ञानगंगा अभयारण्यात पेटला वणवा, वन्यजीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2016 04:56 PM2016-11-18T16:56:18+5:302016-11-18T16:53:32+5:30
ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 18 - ज्ञानगंगा अभयारण्यात वणवा पेटल्याने वन्य प्राण्यांचे जिव धोक्यात आले आहे. गवत जाळल्यामुळे हा ...
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 18 - ज्ञानगंगा अभयारण्यात वणवा पेटल्याने वन्य प्राण्यांचे जिव धोक्यात आले आहे. गवत जाळल्यामुळे हा वणवा पेटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वणवा पेटल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
वणवा पेटण्याची समस्या जगातील विविध अभयारण्याची आहे. पर्यटक अभयारण्यात सहलीसाठी येतात. काही अभयारण्यातून रहदारी असलेल्या रस्त्याच्या कडेला लोकांची ये-जा सुरु असते. येणारे जाणारे सगळेच सारखे असतात असे नाही, परंतु काही लोकांच्या चुकीमुळे अनेकदा अभयारण्याच्या अभयारण्य पेट घेतात.
अभयारण्याच्या लगतच्या रस्त्याच्या कडेला धुम्रपान करू नये, अशा सूचना अनेक ठिकाणी दिसून येतात. तरीही काही व्यक्तींच्या धूम्रपानाच्या वाईट सवयीमुळे अनेकदा आगेची ठिणगी पडते, त्याचा मोठया वणव्यात रुपांतर होते. अशा वणव्यात अभयारण्यातील लाखो झाडे जळतात, अनेक पशु-पक्षांची घरटी जळतात.
अनेक वन्यजीवांना इजा होते. याकडे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करताना दिसून येतात. हे गवत जाळत असताना व्यवस्थित खबरदारी घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात वनवा पेटतो असाच वणवा २०१५ ला पेटला होता. यासाठी वन्यप्रेमी, वरिष्ठ अधिका-यांनी दखल घेणे गरजेचे आहे.
युवाशक्तीने पुढकार घेणे गरजेचे
मनुष्य हा अन्य प्राणीमात्रांचा मालक आहे, अशी भावना बाळगणे चुकीचे आहे. उलट अन्य प्राण्यांपेक्षा निसर्गत:च मनुष्याला ज्या अधिक गोष्टी मिळाल्या आहेत, त्याच्या बळावर त्याने स्वत: वन्य प्राण्यांचा विश्वस्त मानले पाहिजे. परंतु आज स्वाथार्पायी माणूस हे विसरत चालला आहे. आपल्या भागातील वने सुरक्षित ठेवण्यासाठी व वन संपत्ती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी देशाची युवाशक्ती फार मोठी शक्ती आहे. या युवाशक्तीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात २०१५ मध्ये वणवा पेटला होता. त्याचा अभ्यास करून वन्यजीव सोयरे बुलडाणा यांनी २४ जुलै २०१६ रोजी वनवा व्याप्त क्षेत्रात बीजारोपण केले. सदर बीजारोपण यशस्वी झाले असून भविष्यात वणवा पेटला तर पुन्हा बीजारोपण करणार आहेत पण वणवा पेटुच नये ही अपेक्षा आहे. -नितीन श्रीवास्तव, सदस्य, वन्य जीव सोयरे, बुलडाणा
https://www.dailymotion.com/video/x844iko