VIDEO : शेतक-याच्या मुलाने टाकाऊ वस्तूंपासून बनवले चार्जर
By Admin | Published: December 28, 2016 02:42 PM2016-12-28T14:42:21+5:302016-12-28T15:06:58+5:30
ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 28 - घरातील टाकाऊ व अडगळीत फेकलेल्या वस्तूंपासून राजूर येथील एका शेतक-याच्या अकरा वर्षांच्या मुलाने ...
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 28 - घरातील टाकाऊ व अडगळीत फेकलेल्या वस्तूंपासून राजूर येथील एका शेतक-याच्या अकरा वर्षांच्या मुलाने बॅटरी व मोबाईल चार्ज करणारे यंत्र विकसित केले आहे. तुषार ढगे असे या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील विनोद ढगे हे शेतकरी असून त्यांच्याकडे 3.5 एकर शेती आहे. शेतीतील उत्पन्नातून ते उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा तुषार हा एडेड शाळेमध्ये पाचव्या वर्गात शिक्षण घेत आहे. अकरा वर्षे वय असलेल्या या मुलाने घरातील लाकडी पट्टी, कॅसेटच्या उपयोगात गाणे ऐकू येणारा एक टेपरेकॉर्डर व वायरच्या माध्यमाने एक यंत्र विकसित केले आहे.
त्याने लाकडाच्या पट्टीवर टेपरेकॉर्डरमधील कॅसेट फिरणारे यंत्र जोडले. या यंत्राला गोल फिरवल्यावर त्यातून उर्जा निर्मिती होते. ही उर्जा निर्मिती झाल्यानंतर याद्वारे एलईडीचा लाईट लागतो. तसेच यातून निर्माण होणा-या उर्जेव्दारे मोबाईलही चार्ज होतो. ग्रामीण भागामध्ये रात्री सहा ते आठ तास भारनियमन असते. त्यामुळे अशावेळी अंधारामध्ये या यंत्रावर एलईडीचा लाईट लावून बॅटरी म्हणूनही याचा उपयोग करण्यात येतो.
ना गुरू ना पुस्तक, खेळता खेळता लागला शोध
मुलांमध्ये उत्सुकता अधिक असते. याच उत्सुकतेतून नवनवीन शोध लागतात. तुषार हा राजूर या छोट्याशा खेड्यात राहतो. त्याला कुणीही गुरू नाही किंवा कोणतेही पुस्तक न वाचता केवळ खेळता खेळता त्याने या यंत्राचा शोध लावला आहे. खेळता खेळताच त्याला अशाप्रकारे यंत्र विकसित होवू शकते, अशी कल्पना आली व त्याने ती प्रत्यक्षात उतरविली.
https://www.dailymotion.com/video/x844mpq