VIDEO - राजूर घाटात दरड कोसळण्याची भीती, अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2017 02:16 PM2017-07-06T14:16:35+5:302017-07-06T14:16:35+5:30
ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 6 - बुलडाणा ते मोताळा मार्गावर असलेल्या राजूर घाटात पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली ...
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 6 - बुलडाणा ते मोताळा मार्गावर असलेल्या राजूर घाटात पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घाटामध्ये दरड कोसळली तर अपघात घडण्याची शक्यता आहे.
बुलडाणा ते मोताळा मार्गावरून मलकापूर, संग्रामपूर या ठिकाणी दररोज शेकडो वाहने धावतात. यामध्ये दुचाकी, चारचाकी, एसटी बस, ट्रक या वाहनांचा समावेश आहे. चार किमी असलेल्या राजूर घाटात अनेक धोकादायक वळण असून, एका बाजुने डोंगर तर दुस-या बाजुने दरी आहे. त्यामुळे वळणावर दरड कोसळल्यानंतर वाहनचालकांना निदर्शनास पडत नाही.
परिणामी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या मार्गावर पावसाळ्यात अनेकदा दरड कोसळण्याचे प्रकार घडतात. गत दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे या मार्गावर डोंगरातील दगड घसरून रस्त्याच्या कडेला पडलेले आहेत. प्रशासनाने रस्त्यालगत पडलेले दगड हटविण्याची गरज आहे. डोंगरालगत रस्ता असल्यामुळे आणखी दरड कोसळली तर संपूर्ण मलबा रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. गत आठवड्यात दरड कोसळल्यामुळे एक दिवस जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रशासनाने आधीच खबरदारी घेण्याची गरज आहे.
https://www.dailymotion.com/video/x84578i