VIDEO : रुईखेड मायंबा येथील घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांचा मोर्चा

By Admin | Published: June 16, 2017 08:41 PM2017-06-16T20:41:09+5:302017-06-16T20:45:00+5:30

ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 16 -  रुईखेड मायंबा येथील चर्मकार समाजातील दलित महिलेला मारहाण करुन तिची नग्नधिंड काढण्याच्या निषेधार्थ  ...

VIDEO: A front organization of various organizations protesting the incident in Ruqhed Maunbaba | VIDEO : रुईखेड मायंबा येथील घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांचा मोर्चा

VIDEO : रुईखेड मायंबा येथील घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांचा मोर्चा

Next

ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 16 -  रुईखेड मायंबा येथील चर्मकार समाजातील दलित महिलेला मारहाण करुन तिची नग्नधिंड काढण्याच्या निषेधार्थ  बुलडाणा शहर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पुढाकाराने चर्मकार ऐक्य परिषदेच्या व इतर समविचारी संघटनेच्या सहकार्याने हजारोंचा मोर्चा  आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री बबनराव घोलप, माजी मंत्री नितीन राऊत, आ. भाऊसाहेब कांबळे,  माजी आमदार बाबूराव माने, माजी आमदार राणा
दिलीप सानंदा, चंद्रप्रकाश देगलूरकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला प्रदेशाध्यक्ष मिराताई शिंदे, भानुदास विसावे, लक्ष्मणराव घुमरे, भाई अशांत वानखडे, राज्यध्यक्ष माधवराव गायकवाड, सरोज बिसुरे, उमाकांत डोईफोडे यांच्यासह राज्यभरातील विविध मान्यवर उपस्थित होते. मोर्चापुर्वी गांधी भवन येथे भव्य निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांनी महिलेस न्याय मिळेपर्यंत संघर्ष करण्याचे सुतोवाच करुन चर्मकार ऐक्य हेच माझे स्वप्न आहे. व्यक्तीपेक्षा समाज मोठा आहे. हेच ऐक्य अखंड टिकवा असे आवाहन त्यांनी केले. सरकारचे या प्रकरणाकडे दुर्लक्ष आहे असे त्यांनी नमूद केले. माजी मंत्री नितीन राऊत यांनी देशात भाजप सरकार
आल्यापासून अन्याय अत्याचार वाढल्याचे सांगितले. माजी आमदार बाबुराव माने यांनी चर्मकार ऐक्याचे स्वागत करुन हे ऐक्य भविष्यात टिकेल अशी अपेक्षा व्यक्त केली.  लक्ष्मणराव घुमरे यांनी घटनेचा निषेधकरुन सर्वांनी एकत्र येऊन अशा घटनांचा विरोध करण्याचे आवाहन केले. दामोधर बिडवे यांनी बारा बलुतेदार महासंघातर्फे मोर्चाला जाहीर पाठींबा देवून अन्यायग्रस्त महिलेस न्याय देण्याची मागणी केली. समतेचे निळे वादळाचे भाई अशांत वानखडे यांनी सर्व बहुजनांनी एकत्र येवून लढण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचे सांगून आपली संघटना अशा घटनांचा निषेध करुन न्याय मिळवून देण्यासाठी झटत राहील
याची ग्वाही दिली. राणा दिलीपकुमार सानंदा यांनी समाजाच्या ऐक्याचे कौतुक करुन सदर महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमच्या सोबत असल्याचे सांगितले. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी समाजाने संघटीत होऊन अन्यायाविरुध्द लढण्याचे आवाहन केले. भाई सुगदाने यांनी हा लढा केवळ चर्मकारांचानाही तर सर्वांचा असल्याचे नमूद करुन अन्यायविरुध्द पेटून
उठण्याचे आवाहन केले. भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा संयोजक कुणाल पैठणकर यांनी झालेल्या अन्यायाची समिक्षा करतांना बहुजन समाजातील ऐक्याचा अभाव हेच आमच्यावरील अन्यायाचे कारण आहे यावर उपाय बहुजनांचे एैक्याची वज्रमुठ
बांधणे हाच आहे, असे सांगितले. मिराताई शिंदे यांनी महिला अन्यायाविरुध्द पेटून उठावे व प्रतिकार करण्याचे आवाहन केले. अशोक कानडे, संजय खामकर यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. चंद्रप्रकाश देगलूरकरांनी चर्मकार समाजाला फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार स्वीकारण्याचे आवाहन करुन या घटनेचा निषेध केला. यावेळी संपूर्ण राज्यामधून चर्मकार समाजातील
पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात मोर्चाचे मुख्य संयोजक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष ज्ञानदेवराव काटकर यांनी घटनेची संपूर्ण माहिती कथन करुन बुलडाणा जिल्हा जिजाऊंचे माहेरघर असताना या घटनेने संपूर्ण मानवजातीला कलंकीत केल्याचा निषेध करुन मोर्चात सहभागी सर्व संघटनांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाला प्रा. आर. एस. बशिरे, प्रा. गजानन चिम, रामकृष्ण वानरे, भागवत तांदळे, आत्माराम चांदोरे, डॉ. बबन परमेश्वर, प्रा. लक्ष्मण
शिराळे, आर. आर. काझी तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सर्व तालुकाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला-पुरुष हजर होते.  

https://www.dailymotion.com/video/x8454km

Web Title: VIDEO: A front organization of various organizations protesting the incident in Ruqhed Maunbaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.