VIDEO : उपोषणकर्त्यांनी थंडीपावसात काढली रात्र, शासनाकडून दखल नाहीच
By Admin | Published: January 27, 2017 06:07 PM2017-01-27T18:07:06+5:302017-01-27T18:20:15+5:30
ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 27 - गुरूवारी मध्यरात्री शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. या परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चार ...
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 27 - गुरूवारी मध्यरात्री शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. या परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चार उपोषणात सहभागी पंधरा उपोषणकर्ते महिला - पुरुषांना आडोसा न मिळाल्यामुळे रात्र थंडी व पावसात काढावी लागली.त्यामुळे प्रशासनाने उपोषणाची वेळीच दखल घेतली असती, तर हा त्रास टळला असता, असा आरोप उपोषण कर्त्यांनी केली आहे.
हक्क आणि आपल्या न्याय मागण्यासाठी २५ जानेवारीपासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयापुढे चार उपोषण सुरु आहे. या उपोषणकर्त्यांना प्रशासनाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने उपोषण तिस-या दिवशीही सुरुच आहे.
उबाळखेड येथील प्रकाश बनसोड वृद्ध आईवडिलासह घरकुलच्या मागणीसाठी, जळगावातील गणेश शालीग्राम इंगळे हे अतिक्रमणांच्या विरोधात, सुलतानपूर येथील संजय देवराव पनाड हे रोजगार मिळण्यासाठी तसेच मेहकर नजिकच्या वडाळीच्या इंदिराबाई सातपुते या सात महिलासह उपोषणास बसले आहे.
२५ जानेवारी रोजी निवेदन दिल्यानंतर, मागण्या मान्य झाल्याचे आश्वासन प्रशासनाकडून या चारही उपोषणकर्त्यांना मिळले, मात्र प्रशासनाने तसे लेखी दिले नाही. त्यामुळे उपोषण सुरुच आहे. गुरुवारी २६ जानेवारी रोजी मध्यरात्री तीन तास पाऊस पडला. त्यामुळे सर्व उपोषणकर्त्यांना वेळेवर आडोसा न मिळाल्यामुळे अत्यंत कष्ट सहन करत रात्र पावसात काढावी लागली.
https://www.dailymotion.com/video/x844q1c