VIDEO : वादळी पावसाने केळी बागा भुईसपाट

By Admin | Published: June 16, 2017 06:06 PM2017-06-16T18:06:27+5:302017-06-16T19:11:05+5:30

ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 16 -  केळी उत्पादकांना या उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्रतेचा फटका बसला. उन्हाचे प्रमाण जास्त व पाणी ...

VIDEO: Kale Bagha Bhayipat with windy rain | VIDEO : वादळी पावसाने केळी बागा भुईसपाट

VIDEO : वादळी पावसाने केळी बागा भुईसपाट

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 16 -  केळी उत्पादकांना या उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्रतेचा फटका बसला. उन्हाचे प्रमाण जास्त व पाणी कमी पडल्याने केळीचे उत्पादन घटले; त्यात केळीला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे यावर्षी केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. तरा आता पावसाळ्यात अनेक ठिकाणी वाऱ्या पाण्यामुळे फडाने भरलेली केळीची झाडेच भुईसपाट होत असल्याचे दिसून येत आहे.
पश्चिम वऱ्हाडातील शेतकरी आधुनिक शेतीची कास धरत फळबाग घेण्याकडे वळले आहेत. त्यात केळी या फळबागेकडे सार्वाधिक शेतकऱ्यांचा कल आहे. बुलडाणा, वाशिम व अकोला या तीनही जिल्ह्यामध्ये सिंचनाची सुविधा असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड केलेली आहे. परंतू आता केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. उन्हाळ्यात यावर्षी जास्त उन तापल्याने केळीच्या फडांना याचा सर्वाधिक फटका बसला. केळीला उन्हाळ्यात जास्त पाणी लागते; परंतु यावर्षी पाणी कमी पडल्याने उत्पादनातही घट आली. आता पावसाळ्यातही केळी फळबागेचे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान होत आहे.
जिल्ह्यात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाºयामुळे केळीचे झाडे भूईसपाट झाले आहे. केळीला लागलेल्या घडाचेही यामुळे नुकसान झाले आहे. परिणामी यावर्षी केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.

 
https://www.dailymotion.com/video/x8454h3

Web Title: VIDEO: Kale Bagha Bhayipat with windy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.