VIDEO : बुलडाण्यात प्रचारतोफा थंडावल्या, भेटीगाठी सुरू
By Admin | Published: February 14, 2017 06:50 PM2017-02-14T18:50:47+5:302017-02-14T18:57:35+5:30
ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 14 - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी १६ फेबु्रवारी रोजी मतदान होत आहे. त्यामुळे १४ ...
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 14 - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी १६ फेबु्रवारी रोजी मतदान होत आहे. त्यामुळे १४ फेबु्रवारी रोजी प्रचारतोफा थंडावल्या असून, उमेदवार प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर देत आहे. निवडणूक विभागाच्यावतीने मतदानाची तयारी सुरू झाली आहे. गत एक महिन्यापासून जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणुक लढविल्यामुळे अधिकच रंगत वाढली आहे. उमेदवारांची विजयी होण्यासाठी चढाओढ सुरू असून, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. जिल्ह्यात मंगळवारी काँग्रेसचे केंद्रीय सरचिटणीस मूकूल वासनिक, भाजपचे निवडणूक प्रभारी तथा कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, पिरीपाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, भारिपचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभा पार पडल्या. आपल्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन करीत असतानाच विरोधी पक्षाच्या ध्येय धोरणावर त्यांनी जोरदार टीकाही केली. मंगळवारी सायंकाळी ५ वाजतापासून प्रचारतोफा थंडावल्या आहेत. आगामी दोन दिवस उमेदवारांचा मतदारांच्या प्रत्यक्ष
भेटीगाठी घेण्यावरच भर राहणार आहे. निवडणूक विभागाच्यावतीनेही मतदान प्रक्रिया सुरूळीत पार पाडण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. बुलडाणा व चिखली येथे बी. यू.- सी. यू. यंत्र सिल करण्यात आले.
https://www.dailymotion.com/video/x844r44