vidhan sabha 2019 : चिखली बनले पक्षांतराचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 02:54 PM2019-09-27T14:54:24+5:302019-09-27T14:54:32+5:30
मतदारसंघ सध्या पक्षांतराच्या बाबतीच केद्रंस्थानी आला असून आता राहूल बोंद्रेंची प्रतीक्षा असल्याची चर्चा आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: विधानसभा निडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत असतानाच जिल्ह्यात नव्या समिकरणांची नांदी सुरू झाली असून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. ज्या चिखली विधानसभा मतदारसंघावरून इतिहासात मोठे रणकंदन झाले होते. तोच मतदारसंघ सध्या पक्षांतराच्या बाबतीच केद्रंस्थानी आला असून आता राहूल बोंद्रेंची प्रतीक्षा असल्याची चर्चा आहे.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी संघटनेशी काडीमोड घेतल्यामुळे रविकांत तुपकर हे स्वाभामीनी शेतकरी संघटनेत दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनले होते. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपद बहाल करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचारात मोठी भूमिका निभावली होती. त्यावेळी त्यांची भाषणे चांगलीच गाजली होती.
दरम्यान, तुपकर यांनी २५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जवळपा एकसात चर्चा केली होती. त्या पृष्ठभूमीवर २६ सप्टेंबर रोजी त्यांनी स्वाभीमानीच्या आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा अवघ्या साडेचार ओळीत राजीनामा दिला.
दरम्यान, आता त्यांची पुढची भूमिका नेमकी काय राहणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र भाजपच्या वाटेवर ते असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेला हा मोठा धक्का मानल्या जात आहे.
दुसरीकडे गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान चिखलीचे विद्यमान आ. राहूल बोंद्रे विरोधात रविकांत तुपकर यांनी मोठी आघाडी उघडली होती. सध्या काँग्रसचे हे आ. राहूल बोंद्रे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणावर अफवांना पेव फुटले आहेत. दिल्ली, मुंबईच्या वाºयाही राहूल बोंद्रेंनी केल्या आहेत. सोबतच आपण काँग्रेसचेच आहोत आणि राहणार असे वक्तव्यही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे. त्यामुळे त्यांच्या ‘तळ््यात-मळ््यातील’ भूमिकेमुळे भाजपसह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशा स्थितीत बोंद्रेंचा नेमका निर्णय काय याचीच आता प्रतीक्षा उरली आहे. येत्या दोन दिवसात जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या आणखी काही मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.