vidhan sabha 2019 : उमेदवारांच्या खर्चावर करडी नजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 02:06 PM2019-10-02T14:06:14+5:302019-10-02T14:06:23+5:30

रोख रकम १० लाखांपेक्षा जास्त पकडल्यास त्वरित आयकर विभागाला कळवावे.

vidhan sabha 2019: A look at the candidates' expenditure! | vidhan sabha 2019 : उमेदवारांच्या खर्चावर करडी नजर!

vidhan sabha 2019 : उमेदवारांच्या खर्चावर करडी नजर!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : विधानसभा निवडणूकीत प्रशासनाने विविध पथकांची नियुक्ती केली आहे. स्थायी पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक व तपासणी नाका पथकांमधील कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेत प्रामाणिकपणे काम करावे. उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक खर्चाची नोंद करावी, त्यासाठी नियुक्त पथकांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी दिल्या आहेत. उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक विभागाची करडी नजर राहणार आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय स्थायी, सहायक खर्च निरीक्षक यांची बैठक निवडणूक खर्च निरीक्षक यांच्यासमवेत जिल्हा नियोजन समिती सभागृहात शनिवारी आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मलकापूर, खामगाव व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक ब्रजेश कुमार, बूलडाणा व चिखली विधानसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक किण्व बाली, आयकर विभागाचे श्रवण कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत आदी उपस्थित होते. पथकांमधील सदस्यांनी काम करताना मिळालेल्या न्यायिक अधिकारांचा उपयोग करण्याच्या सूचना देत खर्च निरीक्षक किण्व बाली म्हणाले, व्हिडीओ पथकाने चेक नाक्यांवर वाहन तपासणी करताना पुर्ण पुरावे व्हिडीओत घ्यावे. जाहीर सभांमध्ये प्रत्येक खर्चाची नोंद घ्यावी. ही नोंद घेण्यासाठी शॅडो रजिस्टर देण्यात आले आहे. शॅडो रजिस्टर व उमेदवारांनी सादर केलेला खर्च याचा ताळमेळ लावावा.
कुठल्याही परिस्थितीत उमेदवाराने केलेला खर्च सोडू नये, हे काम करताना न्यायपूर्वक व्यवहार ठेवत दबावाला बळी पडू नये, रॅलीमधील पूर्ण वाहनांचे शूटींग घ्यावे, त्यामध्ये प्रकर्षाने वाहन क्रमांक आले पाहिजेत असेही ते म्हणाले. आयकर विभागाचे श्रवण कुमार म्हणाले, रोख रकम १० लाखांपेक्षा जास्त पकडल्यास त्वरित आयकर विभागाला कळवावे. त्यावर आयकर विभाग पुढील कारवाई करेल. यानंतर खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल जाधव यांनी उपस्थितांना खर्च नोंदीबाबत प्रशिक्षण दिले. याप्रसंगी विधासनभा मतदारसंघातील नियुक्त कर्मचारी, जिल्हास्तरीय समित्यांचे प्रमुख उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

Web Title: vidhan sabha 2019: A look at the candidates' expenditure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.