विजय तनपुरे यांना विश्व शिवशाहीर पुरस्कार जाहीर; सिंदखेडराजात होणार पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 08:42 PM2018-01-10T20:42:36+5:302018-01-10T20:45:14+5:30
सिंदखेडराजा : आतंरराष्ट्रीय शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना ‘विश्व शिवशाहीर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. १२ जानेवारीला सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : आतंरराष्ट्रीय शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना ‘विश्व शिवशाहीर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. १२ जानेवारीला सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात छत्रपती खा. उदयनराजे भोसले, छत्रपती खा. संभाजीराजे भोसले, तंजावारचे छत्रपती बाबाजीराजे भोसले, माजी खा. नाना पटोले, मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहकरे, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, अमेरिकेतील न्युयॉर्क येथील स्वप्नील खेडेकर आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
शिवशाहीर तनपुरे महाराज यांना यापूर्वीही राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार, राज्यस्तरीय मराठा भुषण पुरस्कार, बीड येथे कार्यगौरव, वैजापूर येथील शिवशंभुरत्न, शिड्डी येतील साईभुषण, घाटकोपर येथील वारकरी भुषण असे अनेक पुरस्कार त्यांना यापूर्वी मिळालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास परदेशात त्यांनी पोहोचवला आहे. शिवाजी महाराजांवरील पोवाडा, यशाचा नवामंत्र शिवतंत्र, भैय्युजी महाराज, स्व. गोपीनात मुंडे, सदगुरू नारायण गिरी महाराज, श्री संत भगवान बाबा यांच्यावरील अनेक पोवाडे त्यांनी सादर केलेले आहेत. सोबतच शिर्डीमध्ये त्यांनी अपंगांच्या कल्याणासाठी शिवाश्रमासारखा मोठा प्रकल्प त्यांनी उभारला आहे.