‘सरपंच अवॉर्ड’साठी गावे सरसावली! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:56 AM2017-11-11T00:56:37+5:302017-11-11T00:56:49+5:30

बुलडाणा: गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू  केलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ या योजनेस जिल्ह्यातून भरघोस प्र ितसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सरपंचांनी आपली नामांकने दाखल  करण्यास सुरुवात केली आहे. सरपंचांना गौरविणारा जिल्ह्यातील हा  पहिलाच पुरस्कार सोहळा आहे.  

Village for 'Sarpanch Award'! | ‘सरपंच अवॉर्ड’साठी गावे सरसावली! 

‘सरपंच अवॉर्ड’साठी गावे सरसावली! 

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लोकमत’च्या योजनेचे स्वागत : सरपंच व जनतेकडून नामांकने दाखल  होण्यास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू  केलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ या योजनेस जिल्ह्यातून भरघोस प्र ितसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सरपंचांनी आपली नामांकने दाखल  करण्यास सुरुवात केली आहे. सरपंचांना गौरविणारा जिल्ह्यातील हा  पहिलाच पुरस्कार सोहळा आहे.  
सरपंचांनी गावातील जल, वीज व्यवस्थापन, तसेच कृषी, आरोग्य आदी  बारा क्षेत्रांत केलेल्या कामांची नोंद घेऊन या प्रत्येक क्षेत्रात चांगले काम  करणार्‍या सरपंचांना जिल्हा पातळीवर ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत  सरपंच अवॉर्ड-२0१७’ दिला जाणार आहे. पतंजली आयुर्वेद हे या उ पक्रमाचे प्रायोजक तर महिंद्रा ट्रॅक्टर्स हे सहप्रायोजक आहेत. या बारा  पुरस्कारांसह सर्वांंगीण काम असणार्‍या सरपंचास ‘सरपंच ऑफ द इयर’  हा अवॉर्डही दिला जाणार आहे. याच सरपंचांचे पुढे राज्यपातळीवरील  अवॉर्डसाठी नामांकन होणार आहे. त्यातून या विभागांतील राज्यस्तरावरचे  पुरस्कारार्थी निवडले जातील.  
आदर्श सरपंचांचा शोध घेत त्यांच्या धडपडीची दखल घेण्यासाठी व इ तरांना प्रेरणा देण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली  आहे. सरपंच स्वत: या पुरस्कारांसाठी आपले नामांकन दाखल करू शक तात. याशिवाय जनताही त्यांना आदर्श वाटणार्‍या सरपंचांचे नामांकन  दाखल करू शकते. ‘लोकमत’चे ज्युरी मंडळ या नामांकनाची छाननी  करून पुरस्कारार्थींंची निवड करणार आहे.  

पुरस्कारांसाठीचे जिल्हे
अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद,  लातूर, जालना, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे,  सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत प्रथम वर्षी ही पुरस्कार योजना  असेल.

चला सहभागी होऊ या
१ नोव्हेंबर २0१६ ते ३१ ऑक्टोबर २0१७ या काळात सरपंच पदावर  कार्यरत असलेले आजी, माजी व नवनियुक्त सरपंच या पुरस्कार योजनेत  आपले नामांकन दाखल करु शकतील. नामांकनासाठीच्या प्रवेशिका  ‘लोकमत’च्या जिल्हा व विभागीय कार्यालयांत उपलब्ध आहेत. www.lokmatsarpanchawards.in या संकेतस्थळावर सरपंच तसेच नागरिकही  पुरस्कारांसाठी नामांकने दाखल करु शकतात. अधिक माहितीसाठी  ९९२३३७८४७६, ९९२0१७९२८२ या क्रमांकांवर संपर्क करावा. 

Web Title: Village for 'Sarpanch Award'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.