बिबट्याच्या हल्यात शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ पुनर्वसनासाठी आक्रमक

By संदीप वानखेडे | Published: September 24, 2023 12:50 PM2023-09-24T12:50:49+5:302023-09-24T12:51:06+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आश्वासनानंतर आंदाेलन मागे

Villagers aggressive for rehabilitation after farmer's death in leopard attack | बिबट्याच्या हल्यात शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ पुनर्वसनासाठी आक्रमक

बिबट्याच्या हल्यात शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ पुनर्वसनासाठी आक्रमक

googlenewsNext

बुलढाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी येथील सुनील निवृत्ती झीने (४४) या शेतकऱ्याचा बिबट्याच्या हल्यात २३ सप्टेंबर राेजी मृत्यू झाला हाेता़ या शेतकऱ्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर ग्रामस्थ पुनर्वसनाच्या मागणीसाठी आक्रमक झाले हाेते़ तसेच मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्याचा इशारा दिला हाेता़ अखेर आमदार संजय गायकवाड यांनी साेमवारी जिल्हाधिकाऱ्यांसाेबत बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावाकडे रवाना करण्यात आला़

ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. या मागणीसाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदाेलन केली आहेत़ मात्र निधी उपलब्ध झाल्यानंतरही या गावाचे पुनर्वसन झालेले नाही़ अशातच २३ सप्टेंबर राेजी शेतात माकडाला हाकलण्यासाठी गेलल्या सुनील झीने यांच्यावर बिबट्याने हल्ला केला़ यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला़ वनविभागासह पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून पंचनामा केला़ तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे पाठवण्यात आला हाेता.

दरम्यान, रविवारी ग्रामस्थ पुनर्वसनाच्या मागणीसाठी चांगलेच आक्रमक झाले हाेते़ झीने यांचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला हाेता़ मात्र, आमदार संजय गायकवाड, उपविभागीय पाेलीस अधिकारी गुलाबराव वाघ, वन परिक्षेत्र अधिकारी चेतन राठाेड, शहर पाेलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर, वन विभागाचे अधिकारी यांनी ग्रामस्थांची समजूत काढली़ तसेच साेमवारीच जिल्हाधिकारी यांच्याबराेबर बैठक घेवून हा प्रश्न निकाल काढण्याचे आश्वासन दिले़ त्यामुळे, ग्रामस्थांनी झीने यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रवाना केला.

Web Title: Villagers aggressive for rehabilitation after farmer's death in leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.