अतिक्रमण हटविण्यासाठी नंधाना येथील नागरिकांचे उपोषण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 04:16 PM2018-11-12T16:16:29+5:302018-11-12T16:16:37+5:30
वाशिम : जिल्ह्यातील नंधाना (ता.रिसोड) येथे ग्रामपंचायत हद्दीतील पुतळा परिसरात काही लोकांनी केलेले अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे, या मागणीसाठी बौद्ध पंच मंडळातील सचिव, सदस्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयानजिक १२ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

यासंदर्भात जिल्हाधिकाºयांकडे सादर केलेल्या निवेदनात उपोषणकर्त्यांनी नमूद केले आहे, की गावातील मालमत्ता क्रमांक ४१९ वर ३० बाय ६० अशी १८०० चौरस फूट क्षेत्रफळाची जागा पुतळा परिसराची आहे. गावातील बौद्धमंडळी त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज, अन्नाभाऊ साठे व अन्य महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम घेतात. पुतळा परिसराची देखभाल ग्रामपंचायत व बौद्ध पंच मंडळ करित असते. असे असताना सदर जागेवर सतीश चतुर, संतोष चतुर, गणपत चतुर, ओंकार चतुर, दादाराव चतुर, बबन कांबळे आदिंनी विटा, सिमेंटचे पक्के अतिक्रमण केले आहे.
मध्यंतरी गटविकास अधिकाºयांनी ग्रामपंचायतीला निर्देश देवून वेळप्रसंगी पोलिस बंदोबस्तात सदर अतिक्रमण हटविण्याचा आदेश दिला. मात्र, सरपंचाने कुठलीच ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे अखेर बौद्ध पंच मंडळातील पदाधिकारी, सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोनठिकाणी व रिसोड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयासमोर १२ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले.