आजारी युवकासाठी ग्रामस्थांनी उभारले ७१ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:32 AM2021-08-01T04:32:21+5:302021-08-01T04:32:21+5:30
एका महिन्यापूर्वी देऊळगाव माळी येथील सुमित गवई याच्या पायाला जखम झाली होती. तो शेतामध्ये खत पेरण्यासाठी गेला. खत पेरून ...
एका महिन्यापूर्वी देऊळगाव माळी येथील सुमित गवई याच्या पायाला जखम झाली होती. तो शेतामध्ये खत पेरण्यासाठी गेला. खत पेरून झाल्यावर प्रचंड पाऊस आला आणि पावसामुळे त्याच्या जखमेमधून त्या खताचे प्रचंड इन्फेक्शन झाले. सुमितला पायाच्या उपचारासाठी दररोज २००० रुपये खर्च लागू लागला. देऊळगाव माळी येथील कैलास राऊत यांनी सोशल मीडियावर सुमितच्या पायाच्या प्लास्टिक सर्जरीसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सुमितच्या वैद्यकीय उपचारासाठी शेलगाव काकडे मित्रमंडळ १५ हजार, वरोडी येथील मित्रमंडळ पाच हजार, प्रकाश भाऊ डोंगरे मित्रमंडळ पाच हजार, लंगोटी यार ग्रुप पाच हजार यांच्यासह गावकऱ्यांनी तब्बल ७१ हजार रुपयांचा निधी उभा करून तो सुमितकडे सुपुर्द केला. यावेळी तरुणाई फाऊंडेशनचे अध्यक्ष कैलास राऊत, राहुल गवई, व उपस्थित प्रकाश डोंगरे मित्र मंडळाचे सदस्य देवानंद बळी, राहुल सुरूशे, भिकाजी गवई, राजू गाडेकर सुमितचे आजोबा नामदेव गवई व ग्रामस्थ उपस्थित होते.