समृद्ध गाव स्पर्धेतील पात्र गावांचा होणार सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:31 AM2021-07-26T04:31:36+5:302021-07-26T04:31:36+5:30
धामणगाव बढे : पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्यमेव जयते समृद्ध गाव मिनी स्पर्धेअंतर्गत पात्र गावांचा जिल्हाधिकारी एस. ...
धामणगाव बढे : पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्यमेव जयते समृद्ध गाव मिनी स्पर्धेअंतर्गत पात्र गावांचा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या हस्ते २९ जुलै रोजी सन्मान करण्यात येणार आहे.
त्यानुषंगाने सिंदखेड येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समृद्ध गाव स्पर्धा ही दोन टप्प्यात विभागली असून पहिल्या टप्प्यासाठी दिलेल्या ठराविक वेळेत निर्धारित केलेल्या कामांसाठी तेरा गावे पात्र ठरलेली आहेत. समृद्ध गाव स्पर्धेसाठी मोताळा तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. मोताळा तालुक्यातील वीस गावांनी समृद्ध गाव स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे . दरम्यान, या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच गावांची कामगिरी चांगली आहे. निर्धारित वेळेत काम पूर्ण करणाऱ्या तेरा गावांना जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या हस्ते सन्मानपदक तर उर्वरित गावांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह पाणी फाउडेशनचे समन्वयक उपस्थित राहणार आहेत.
--या गावांचा समावेश--
पात्र ठरलेल्या १३ गावांमध्ये मोताळा तालुक्यातील सिंदखेड, उबाळखेड, दाभा, शेलापूर खुर्द, तिघरा, चिंचपूर, उऱ्हा, जनुना, वारुळी, पोखरी, चिंचखेड नाथ, महाळुंगी जहागीर, जयपूर या गावांचा समावेश आहे.