डाेणगावात आचारसंहितेचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:51 AM2021-01-08T05:51:20+5:302021-01-08T05:51:20+5:30
डोणगाव : मेहकर तालुक्यात सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या डोणगावात आचारसंहितेचे उल्लंघन हाेत असल्याचे चित्र आहे. गावातील विकासकामांचे तसेच उद्घाटन ...
डोणगाव : मेहकर तालुक्यात सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या डोणगावात आचारसंहितेचे उल्लंघन हाेत असल्याचे चित्र आहे. गावातील विकासकामांचे तसेच उद्घाटन फलक उघडेच आहेत. याकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखांची घाेषणा हाेताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक असलेल्या गावांमध्ये विकासकामांचे तसेच उद्घाटन फलक झाकणे अपेक्षित आहे. मात्र, डाेणगावात ग्रामपंचायतीची निवडणूक असूनही अनेक विकासकामांचे फलक, उद्घाटन सोहळ्याचे फलक उघडे असल्याने आचारसंहितेचे उल्लंघन हाेत आहे. याकडे निवडणूक आयोगाने लक्ष देणे गरजेचे आहे. शादी खाना, पोलीस स्टेशनमागील परिसरातील व इतर ठिकाणचे फलक उघडेच असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
फलक झाकण्यासाठी तारांबळ
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या विकासकामांच्या फलकांचे फाेटाे काढल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली. गावातील फलक झाकण्याचे आदेश ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिले. काही फलक झाकले असले तरी अनेक उघडेच असल्याचे चित्र आहे.
डाेणगाव येथे आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात येत आहे. तसेच विकासकामांचे फलकही झाकण्यात आले आहेत.
- ज्ञानेश्वर चनखोरे, ग्रामविकास अधिकारी, डोणगाव