खामगावातील हाॅस्पिटलकडून कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 11:43 AM2021-04-29T11:43:04+5:302021-04-29T11:43:27+5:30

Khamgaon hospital : परवानगी घेतलेली नसतानाही रूग्णालयात कोविड रूग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची तक्रार डॉ. प्रल्हाद दाभाडे  यांनी केली होती.

Violation of Covid protocol by Khamgaon hospital | खामगावातील हाॅस्पिटलकडून कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन!

खामगावातील हाॅस्पिटलकडून कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोविड प्रोटोकॉलचे  कथितरित्या उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील लाईफ लाईन हॉस्पीटलच्या चौकशीचे निर्देश तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी बुधवारी दिले. यासंदर्भात पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.  दरम्यान, संबंधित हॉस्पीटलचे डाॅॅ. आशीष अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांना धमकावणारी चित्रफित व्हायरल केल्याने रोष व्यक्त होत आहे.
दरम्यान, यासंदर्भात  डॉक्टरांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.  संबंधित हॉस्पीटलमध्ये कोविड-१९ रूग्ण तपासणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक बुलडाणा यांची परवानगी घेतलेली नसतानाही रूग्णालयात कोविड रूग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची तक्रार डॉ. प्रल्हाद दाभाडे  यांनी केली होती. यांच्या तक्रारीवरून तहसीलदार शीतल रसाळ यांनी खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्ग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांना यांना या हॉस्पीटलची तात्काळ चौकशी करण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे खामगाव शहरातील वैद्यकीय क्षेत्रात त्यामुळे  खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती स्स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान या संपुर्ण  प्रकरणासंदर्भात  डॉ. आशीष अग्रवाल यांच्याशी त्यांच्या दोन्ही भ्रमणध्वनीवर संपर्क  साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ब्ध होऊ शकले नाहीत.


डॉक्टर विरोधात पोलिसात तक्रार
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सोशल मिडियाच्या माध्यममातून धमकावणारी एक चित्रफित व्हायरल केल्याप्रकरणी खामगाव शहर पोलिस ठाण्यात किरण मोरे नामक पत्रकाराने डॉ. आशीष अग्रवाल यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे आता नेमके हे प्रकरण कोणते वळण घेते याकडे वैद्यकीय क्षेत्रासह खामगावचे लक्ष लागून राहले आहे.  दुसरीकडे या प्रकरणाची गंभीरता पाहता तहसिलदारांनी वैद्यकीय अधीक्षकांना पत्र दिल्यानंतर पाच सदस्यीय समिती लगोगल गठीत करण्यात आली आहे.

Web Title: Violation of Covid protocol by Khamgaon hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.