देऊळगाव राजात काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:31+5:302021-06-29T04:23:31+5:30

सायंकाळी ४ नंतरही अनेक दुकाने सुरूच : नागरिकांचाही मुक्त संचार देऊळगाव राजा : काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने ...

Violation of Kareena rules in Deulgaon Raja | देऊळगाव राजात काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन

देऊळगाव राजात काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन

Next

सायंकाळी ४ नंतरही अनेक दुकाने सुरूच : नागरिकांचाही मुक्त संचार

देऊळगाव राजा : काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने जिल्हाभरात साेमवारपासून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. सायंकाळी ४ नंतर सर्व दुकाने बंद करण्याचे, तसेच संचारबंदी असतानाही देऊळगाव राजात पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लंघन करण्यात आले़

महाराष्ट्र शासनाने काेविड-१९च्या अनुषंगाने राज्यात डेल्टा प्लस व्हायरसचा धोका वाढल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये श्रेणीनुसार निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यात श्रेणी तीनचे आदेश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी २६ जून राेजी दिले. यामध्ये सर्वच दुकानांना दररोज सकाळी ७ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली़ तसे आदेश तालुका प्रशासनाला देण्यात आले़ शहरामध्ये नगरपरिषद प्रशासन, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक आणि इतरांवर कारवाई करणे अपेक्षित होते; परंतु शहरात तसे न होता संचारबंदी आदेशाचे पूर्णतः उल्लंघन झालेले दिसले़ पहिल्याच दिवशी २८ जूनला सायंकाळी चारनंतर तुरळक प्रमाणात वगळता सर्व प्रकारची दुकाने सुरू होती़

समन्वयाचा अभाव

यासंदर्भात नगरपरिषदेने नियुक्त केलेल्या पथकातील सदस्यांना विचारले असता, आम्हाला पोलीस प्रशासनाची मदत असल्याशिवाय आम्ही काय कार्यवाही करणार असे सांगितले, तसेच या पथकातील सदस्यांनी स्थानिक बसस्थानक चौकातील पोलीस चौकीजवळ गप्पा मारण्यात वेळ घालविला़

काेराेनाची तिसरी लाट पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करावे़ पथकांनीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार, तसेच नागरिकांवर कारवाई करावी़ याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल़

निवेदिता घार्गे, मुख्याधिकारी, नगरपरिषद देऊळगाव राजा.

Web Title: Violation of Kareena rules in Deulgaon Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.